Ajit Pawar News : काळ बदललाय, आता नवीन नेतृत्वाला ताकद द्या; अजितदादांचा मोठा राजकीय संदेश

Political News : विविध योजनेचे काम करता निधी दिला. अनेक जण टीका करतात. सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sangali News : राजकीय जीवनामध्ये मी गेले 35 वर्षे काम करणारा कार्यकर्ता आहे. सांगली, सातारा या दोन जिल्ह्यांना वेगळी परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने महाराष्ट्राला महाराष्ट्राला आणि देशाला मोठे नेते दिले. मान्यवरांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. मात्र काळा बदलतो त्यामुळे नवीन नेतृत्वाला ताकद देण्याचे काम सरकारमध्ये मान्यवरांनी घ्यायचा असतो, असा राजकीय संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील कार्यक्रमावेळी दिला.

मी काँग्रेसच्या (Congress) पंजावर निवडून आलो होतो. मात्र 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. अनेकजण त्या पक्षात गेलो. मागे न पाहता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही गेलो. रयतेचे राज्य स्थापन करताना 18 पगड जातींना घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य केले, हे आपण पहिले आहे. विविध योजनेचे काम करता निधी दिला. अनेक जण टीका करतात. सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
Hitendra Thakur Vs BJP : भाजप विरुद्ध हितेंद्र ठाकूर 'अ‍ॅक्शन मोड'वर; मनसे, काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बंद दाराआड चर्चा

सांगली महापालिकेमध्ये अनेक जणांनी नेतृत्व केले. पण शहराचा विकास अजून बाकी आहे. स्वतःच्या उत्पन्नावर महापालिका चालू शकत नाही. केंद्रातून आणि अनेक ठिकाण ठिकाणाहून निधी आणावा लागतो. मेट्रो सिटीची संकल्पना राबवणे सांगली शहराला आवश्यक आहे. जवळपास आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता विमानतळ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सांगलीला जर मोठ्या प्रमाणात उद्योग यावे, असे वाटत असतील तर विमानतळ असणे गरजेचे आहे, डेव्हलपमेंट गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Uddhav Thackeray News: भाजप अन् शिंदेंचा हिशेब चुकता करण्यासाठी ठाकरे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा डाव टाकणार ; महायुतीच्या गोटात खळबळ

शक्तीपीठसाठी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार. जनता आणि शेतकरी हा सर्वस्व असते, त्यांना चार पट किंमत देऊन शक्तिपीठ करू. कारण मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथे काम करत आहे. आता तर AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर केला जात आहे. मी नुसते राजकारण करायला आलो नाही, समाजकारण करायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
NCP Politics : महापालिकेपूर्वीच महायुतीत तणाव? दादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळावर नारा

सांगलीमध्ये निधी वाचून काम राहिले, असे होऊन देणार नाही. मला मताचे राजकारण करायचे नाही. धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घ्यायची नाही. मित्रांनो तुमची माणुसकी महत्त्वाची आहे. कोण येथे कायमचा थांबायला आलेला नाही. येथे सगळ्यांनाच स्मशानभूमी आणि दफनभूमीची गरज आहे. मी काही नवीन येऊन सांगतोय, असे लाडक्या बहिणींनो समजू नका. माझ्याकडे नवीन काहीतरी आहे.

नवीन स्कीम आहेत. गुंठेवारी सोयी सुविधा मार्गी लावावी लागणार आहेत. 70, 100 मजली इमारती मुंबईमध्ये होत आहेत. लोकसंख्या वाढत असल्याने करावे लागत आहे. हे करत असताना पर्यावरणाचाही विचार करावा लागणार आहे. मी शब्दाचा पक्का आहे. तुम्हाला असे वाटू नये, आगीतन उठून फुफाट्यात पडलो. त्याची वेळ मी येऊ देणार नाही, असेही अजितदादांनी (Ajit Pawar) स्पष्ट केले.

Ajit Pawar
VBA-Congress: आघाडी की आणखी काही? प्रकाश आंबेडकर अन् हर्षवर्धन सपकाळ यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

मी सकाळी सहाला उठून कामाला लागतो. अधिकाऱ्यांना बोलून योग्य सूचना देतो आणि लोकांचे प्रश्न सोडवतो. मला कामाचा उत्साह आहे, त्याच्यातून मला आनंद मिळतो. सत्ता येत असते सत्ता जात असते. आपण लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय करू शकतो हे मी पाहत असतो. तरुणांना रोजगार आणि उद्योग धंदा करण्यासाठी अनेक महामंडळ आहेत. त्यातून कसा फायदा तरुणांना घ्यायचा यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
NCP Politics : महापालिकेपूर्वीच महायुतीत तणाव? दादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळावर नारा

मी ब्रिटिशांचे कौतुक करत नाही पण त्यांच्या काळामध्ये झालेले काम आजही टिकून आहेत. त्यांच्या शंभर वर्षाची गॅरंटी असते पण आपल्या काळातले पुलला 100 वर्ष टिकत नाहीत. दोष कुणाचा आहे? कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी ? का लोकप्रतिनिधीचा? याबाबत जबाबदार नागरिकांने बारकाईने त्या ठिकाणी लक्ष पाहिजे. माहितीचा अधिकार दिला आहे त्याचा वापर करा. त्यामध्ये काही चुकत असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्याची चौकशी लावू. ज्यांच्यामध्ये विजयाची क्षमता असेल त्यांना संधी देण्याचे काम आपण करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभाग झाल्याने तुम्हाला पश्चाताप होणार नाही. एवढा विश्वास देतो. पूर्वीच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असा विश्वास देतो, असेही त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
BJP Government news : हरियाणातील भाजप सरकार कोसळणार? विधानसभेत अविश्वास ठराव, जाणून घ्या आमदारांचं गणित...

सांगली जिल्ह्यामध्ये अनेक नेतृत्वाने काम केलेले आहे. त्या सर्वांचा मी आदर करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि त्या सर्वांचे अधुरे राहिलेले स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू. अनेक निवडणूक झाल्या आम्ही पण खासदार, आमदार झालो. आता स्थानिक निवडणूक आहेत. याच्यातूनच उद्याचा खासदार आमदार मंत्री होतो, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Congress leader : "काँग्रेसला 'झिरो' करण्याचा विडा! अशोक चव्हाणांनी थेट 'हुकमी एक्का'च फोडला; भाजपच्या खेळीने राजकीय वर्तुळात खळबळ."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com