Eknath Shinde Operation Tiger 3 Begins Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde Operation Tiger 3 Begins : ‘ऑपरेशन टायगर 3’ची निर्णायक तारीख ठरली? महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणखी एका मोठ्या राजकीय स्फोटाच्या तयारीत!

After breaking 6 MPs from Uddhav Thackeray camp, Eknath Shinde Shiv Sena prepares ‘Operation Tiger 3’ targeting 14 MLAs ahead crucial July 8 political showdown : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर 3’ राबवण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.

Pradeep Pendhare

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे पक्षातील सहा खासदारांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर 3’ राबवण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी लक्ष्य आहे शिवसेना ठाकरे पक्षातील तब्बल 14 आमदार! तशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त राजकीय बैठकींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. गेल्या आठवड्यात काही आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याची चर्चा असून, त्यानंतर या संपूर्ण मोहिमेला अधिक वेग आल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार 8 जुलै हा या राजकीय ऑपरेशनचा निर्णायक दिवस ठरू शकतो.

महत्त्वाची बाब म्हणजे पक्षांतर करणाऱ्या आमदारांना (MLA) भविष्यात कोणत्याही कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी आधीपासून सुरू करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर संभाव्य फुटीनंतर या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे नियोजनही तयार करण्यात आल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील विश्वासू शिलेदारांवर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना ठाकरे पक्षाची अस्वस्थता वाढली

राज्यात सध्या सुरू असलेल्या विधानसभा पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी पक्ष सोडत मोठा राजकीय धक्का दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे अजूनही या धक्क्यातून पक्ष संघटना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेत पक्ष पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, आता पक्षातील आमदारांचाच एक मोठा गट वेगळा होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे शिवसेना ठाकरे पक्षात अस्वस्थता वाढली आहे.

पावसाळी अधिवेशनात डाव पडणार?

राजकीय वर्तुळात सध्या अशी चर्चा आहे की, शिवसेना ठाकरे पक्षामधील जवळपास 14 आमदार संपर्कात असून, शिवसेना शिंदे पक्षातील काही नेते आणि मंत्री गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात सातत्याने सूचक वक्तव्य करत आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरीस ‘ऑपरेशन टायगर 3’ यशस्वी झाल्याची घोषणा होऊ शकते, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत.....

विशेष म्हणजे, याआधी खासदारांच्या बंडासाठी ज्या प्रकारची रणनीती आणि कागदपत्रांची तयारी ठाण्यातून करण्यात आली होती, त्याच धर्तीवर या वेळीही संपूर्ण ब्लूप्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जर 8 जुलैला ‘ऑपरेशन टायगर 3’ यशस्वी झाले, तर महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. इतकेच नाही, तर एकनाथ शिंदे यांचे दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय वजन आणखी वाढू शकते. ठाण्यात तर अशीही चर्चा रंगू लागली आहे की, या संपूर्ण घडामोडींनंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे येऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT