Pratap Sarnaik  sarkarnama
महाराष्ट्र

Operation Tiger : ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीबाबत प्रताप सरनाईकांचे मोठे विधान; म्हणाले, 'ऑपरेशन टायगर सुरूच...'

Shiv Sena split News : राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याबाबत दोन दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ठाण्यात बैठक झाली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले आहे. या बैठकीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका केली जात आहे, आता त्यातच या वादात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उडी घेतली आहे. ठाकरेंच्या खासदारासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीबाबत सरनाईकांनी मोठे विधान केले असून राज्यात ३६५ दिवस ऑपरेशन टायगर सुरूच असल्याचे स्पष्ट केले.

ठाण्यात मंत्री सरनाईक यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध बाबीवर प्रकाश टाकला की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या आठ खासदारासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छुप्या पद्धतीने बैठक घेत नाहीत. शिवसेनेचे ऑपरेशन टायगर ३६५ दिवस सुरुच आहे. हे ऑपरेशन कधीच बंद होत नाही. कायमस्वरूपी शिवसेनेत प्रवेश सुरूच असतो. त्यामुळे ऑपरेशन टायगर सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांना जर बैठकाच घ्याव्याच्या असतील तर मंत्रालयात घेऊ. अशा पद्धतीने ते गुपित बैठका घेणार नाहीत. राज्यातील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झाल्या आहेत. येत्या काळात तीन वर्ष निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे काही जणांचा त्यांच्याच पक्षात वजन वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (Shivsena) असंतोष वेगळ्या मार्गाने बाहेर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात मतदारसंघातील कामे झाली पाहिजे. त्यामागणीसाठी राज्यातील विविध पक्षाचे खासदार, आमदार येत असतात. त्यामुळे सातत्याने रेलचेल सुरु असते. त्यामुळे बैठकीबाबत कोणतरी अफवा पसरवली असल्याचे सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, याबाबत श्रीकांत शिंदे (shrikant Shinde) म्हणाले, या बातमीत तथ्य नाही कुठलीही बैठक झाली नाही.वर्षभरापासून ऑपरेशन टायगरबाबत केवळ अफवा आहेत.' शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील अशी कोणती बैठक झाली नाही. या क्षणाला आम्हाला वाटत नाही की त्यांच्यातले खासदार फोडून आमच्यासोबत घ्यावेत. मात्र त्यांच्यात काही नाराजी असेल तर त्याविषयी आम्हाला माहिती नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतूनच अशा बातम्या पसरवल्या जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT