Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarakarnama
महाराष्ट्र

Shivsena Politics : ऑपरेशन टायगर पार्ट 2, उद्धव ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला? दिल्लीत हालचालींना वेग

Operation Tiger Part 2 Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : माजी आमदार राजन साळवी यांनी देखील ठाकरेंची साथ सोडली आहे. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे शिंदें ऑपरेशन टायगरचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

Roshan More

Shivsena MP News : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नावच घेत नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरेंना सोडून जात असताना उपमुख्यंत्री एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेकडूनऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंचे आमदार-खासदार फोडण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते.

पक्ष फूटीच्या वेळी ठाकरेंसोबत राहिलेले राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी देखील ठाकरेंची साथ सोडली आहे. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे शिंदें ऑपरेशन टायगरचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

'ऑपरेशन टायगर'च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फोडण्यात येणार असल्याची दिल्लीत चर्चा आहे. उद्धव ठाकरेंकडे नऊ खासदार आहेत. त्यातील अरविंद सावंत, अनिल देसाई हे ठाकरेंची साथ कधीच सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश खासदारांचा गट वेगळा होऊन बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा खासदार फोडण्याचा एकनाथ शिंदेंचा प्लॅन आहे.

दिल्लीत हलचालींना वेग...

एकनाथ शिंदेंचे खासदार, मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाचा आयोजन केले होते. या स्नेहभोजनाला ठाकरेंचे तीन खासदार उपस्थित असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, परभणीचे खासदार संजय जाधव, बुलढाण्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाची चर्चा आहे.

आदित्य ठाकरेंच्या सूचना

आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी देखील आपल्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये आदित्य यांनी परवानगीशिवाय कोणीही एकनाथ शिंदे यांच्या खासदार, मंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाऊ नये, अशी सूचना केल्याची माहिती आहे.

खासदार संजय जाधव भडकले

एकनाथ शिंदेंचे मंत्री, खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला गेल्याबद्दल ठाकरेंचे खासदार संजय (बंडू) जाधव यांना पत्रकारांनी विचारले असता ते संतापले. म्हणाले, ‘तुम्हाला कोणी जेवायला बोलावले, तर तुम्ही जात नाही का,’ शिवाय ऑपरेशन टायगर विषयी विचारले असता ते म्हणाले ऑपरेशन टायगर फेल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT