Eknath Shinde News : नुकत्याच झालेल्या महापालिकेत विजयी झालेले नगरसेवक फोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. दिल्ली दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री शिंदे हे मध्यरात्री महाराष्ट्रात परत त्याच वेळी मध्यरात्री दोनच्या सुमारास अकोल्यातली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चार नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
अकोला महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा नगरसेवक विजयी झाले होते. त्यातील चार नगरसेवक शिंदेंकडे आल्याने ठाकरेंकडे केवळ दोन नगरसेवक उरले आहेत. ठाकरेंचे जिल्हा प्रमुख मंगेश काळे यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील, सागर भरुका, सोनाली सरोदे, सुरेखा काळे या नगरसेवकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस येत अकोल महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक लढली होती. त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे या महापौर पदाच्या उमेदवार होत्या.
विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू करत ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना फोडायला सुरुवात केली होती. आता महापालिका जिल्हा परिषदेनंतर पुन्हा ऑपेरेशन टायगर अॅक्टिव्ह झाल्याची चर्चा आहे. कारण अकोला महापालिकेतील चार नगरसेवक फोडण्याच्या पूर्वी ठाकरेंचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर उमेश म्हात्रे यांना फोडत आपल्या पक्षात शिंदेंनी प्रवेश दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.