Sangli ZP President : सांगली ZP मध्ये भाजप अन् शिवसेनेकडूनही अध्यक्षपदासाठी अर्ज : सुहास बाबर यांचे 3 सदस्य फुटीच्या उंबरठ्यावर

Sangli Zilla Parishad political crisis: सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेकडून अर्ज दाखल. सुहास बाबर यांच्या गटात बंडखोरीची शक्यता वाढल्याने राजकीय वातावरण तापले.
Sangli Zilla Parishad president election news
Sangli Zilla Parishad president election newsSarkarnama
Published on
Updated on

Political crisis in Sangli Zilla Parishad: सांगली जिल्हा परिषदेमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

अध्यक्षपदासाठी भाजपने दावा केला असताना शिवसेनेकडूनही स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे परिस्थिती अधिकच चुरशीची झाली आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे आता यातील कोण अर्ज माघारी घेणार काय निकाल लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून नागेवाडी येथील जिल्हा परिषद सदस्य शीतल बाबर यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपकडून उपाध्यक्षपदासाठी जयराज पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी बाबर कुटुंबातील उमेदवार असल्याने या लढतीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या निवडणुकीत सुहास बाबर यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ते फ्लोअर मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्या गटातील 3 सदस्य फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे.

जर बाबर यांना उमेदवारी मिळाली नाही, तर हे सदस्य महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेसलाच पाठिंबा देण्यावर शिवसेनेचे 3 सदस्य ठाम असल्याचे समजते.

Sangli Zilla Parishad president election news
Sangli ZP President : सांगली झेडपी अध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्विस्ट, महाविकास आघाडीकडून संगिता पाटलांना उमेदवारी, ठाकरेंच्या उमेदवाराची बंडखोरी?

दरम्यान, शिवसेनेने उमेदवार दिल्यानंतर भाजपकडूनही अध्यक्षपदासाठी उमेदवार मैदानात उतरवण्यात आला आहे. डफळापूर येथील जिल्हा परिषद सदस्य स्वप्नाली मासाळ यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून स्वतंत्र अर्ज आल्याने अध्यक्षपदाची उत्सुकता ताणली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची लढत अधिकच रंगतदार बनली आहे.

Sangli Zilla Parishad president election news
Sangli ZP president : सांगली ZP सत्तास्थापनेत मोठा ट्विस्ट : रोहित पाटलांचे 7 सदस्य गैरहजर राहणार? जयंत पाटलांकडून अखेरच्या क्षणी सभापतीपदाचा शब्द

शिवसेनेकडून स्वतंत्र अर्ज आल्यामुळे निवडणुकीत अनिश्चितता वाढली असून शेवटच्या क्षणापर्यंत काय होणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. शिवसेना अखेरपर्यंत तटस्थ राहणार की भाजपसोबत जाणार, याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com