Eknath Shinde, Uddhav Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena split : एकनाथ शिंदेंकडून 'खासदारांचं' ऑपरेशन यशस्वी : आमदार फुटण्याची शक्यता कमीच... वाचा सविस्तर कारणं!

Political News : शिंदे सेनेचे मिशन खासदार यशस्वी झाले आहे. मात्र आता ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार काय करणार? याची उत्सुकता वाढली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे एका अर्थाने गेल्या काही दिवसापूर्वी घोषणा करण्यात आलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे कॉन्फिडन्स दुपटीने वाढले आहे. त्यासोबतच लोकसभेतील संख्याबळ देखील दुपटीने वाढले आहे. त्यामुळे एका अर्थाने शिंदे सेनेचे मिशन खासदार यशस्वी झाले आहे. मात्र आता ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार काय करणार? याची उत्सुकता वाढली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सेनेने खासदार फोडण्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे सर्वच नेतेमंडळी ऑपरेशन टायगर राबविण्यासाठी आक्रमक झाले होते. गेल्या वर्षभरापासून त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. मात्र पाचच्या पुढे आकडा जात नसल्याने वर्षभरापासून अडचणी येत होत्या. ओम राजेनिंबाळकर व राजाभाऊ वाजे या दोन खासदार येण्यास तयार नसल्याने अडचणी येत होत्या. मात्र, शेवटी ओम राजेनिंबाळकर यांनी तरी दर्शवल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी झाले.

दुसरीकडे शिंदे सेनेला वजन वाढविण्यासाठी दिल्लीत खासदारांची गरज होती. यानिमिताने महायुतीमध्ये राज्यातील सर्वाधिक खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे (Shivsena) आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला आता केंद्रात जास्तीचे एक मंत्रिपद येणार आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत जागावाटप करताना भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. त्यामुळे खासदारांचे मिशन त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.

राज्यात उद्धव ठाकरेंकडे २० विधानसभा सदस्य आहेत. त्यातील दहा सदस्य मुंबईतून निवडून गेलेले आहेत. महापालिका निवडणुकीत मुंबईत उद्धवसेनेच्या हातून सत्ता गेली पण त्यांचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे मुंबईत मनसेचे सहा नगरसेवक आहेत तर भाजपसोबत युतीमध्ये असलेल्या शिंदेसेनेला २९ जागांवर समाधान मानावे लागले होते. उद्धवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता गेली असली तरी आमदारसंख्या आणि नगरसेवकाची संख्या शिंदे सेनेच्या तुलनेत अधिक आहे.

हे समीकरण जुळणार नाही

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या २० आमदारांपैकी दोन तृतीयांश म्हणजे १५ आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला सोबत घ्यावे लागणार आहेत. मात्र, हे आकडे जुळण्याची शक्यता खूप कमी आहे. या पैकी १० आमदार हे मुंबईतील आहेत, ते शिंदेंकडे जाण्याची शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीतील यश-अपयश बघून विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे यांच्या सेनेचे आमदार आपल्या गळाला लावण्याचा शिंदे सेनेचा प्रयत्न असणार आहे. अधिकचे आमदार सोबत घेत विधानसभा जागावाटपात अधिक जागा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आजतरी त्यांचा सगळा फोकस हा खासदार वाढविण्यावर आहे.

उद्धवसेनेचे विधानसभेतील सदस्य

भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील प्रभु, सुनील राऊत, अनंत नर, हारुn रशीद खान, मनोज जामसुदकर, बाबाजी काळे, नितीन देशमुख, सिद्धार्थ खरात, गजानन लवाटे, संजय दरेकर, राहुल पाटील, प्रवीण स्वामी, दिलीप सोपल आणि कैलास पाटील हे सोळा आमदार आहेत. मात्र, यामधील १५ जणांचा गट तयार होणे मुश्किल आहे. दुसरीकडे महायुतीकडील मोठे बहुमत आहे. सध्या २३२ आमदार तीन पक्षांचे आहेत. त्यामुळे त्यांना या आमदारांची सध्या तरी गरज नाही. त्यामुळे सध्या तरी शिंदे सेनेचे आमदार फोडणे टार्गेट नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT