Sanjay Raut | Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Operation Tiger : राऊतांच्या 'त्या' वक्तव्यामुळे ठाकरेंचे खासदार बंड करण्यावर ठाम; पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावात सांगितलं कारण

Uddhav Sena MPs Rebel : बंडखोर गटाने निवडणूक आयोगला ही पत्र पाठवून कळवले आहे की संसदीय पक्षातील दोन-तृतीयांश सदस्यांनी एकनाथ शिंदे गटात विलय केला असून, त्यामुळे दहाव्या अनुसूचीतील (पक्षांतरविरोधी कायदा) तरतुदी लागू होत नाहीत.

Jagdish Patil

Operation Tiger : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची बुधवारी (ता.१७) दिवसभर जोरदार चर्चा झाली. शिवाय ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. मात्र, अद्याप याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र, ठाकरेंच्या खासदारांनी या बंडामागे दिलेले कारण म्हणजे पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होण्याची भीती असल्याचं सांगितलं जात आहे. तर बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावात हेच कारण पुढे केल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेमधील बंडखोर खासदारांनी सह्या केलेल्या चार पानी ठरावात म्हटले आहे की, 'त्यांचा स्वतःच्या पक्षावर विश्वास राहिलेला नाही. पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपासून दूर गेला असून, “शिवसेना” ही काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी स्थापन करण्यात आलेली नव्हती.'

बंडखोर खासदारांचे म्हणणे आहे की, खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दिलेला सल्ला त्यांनी गांभीर्याने घेतला असून, त्यांचा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. "शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी स्थापन झालेली नाही," असंही या ठरावात बंडाचे समर्थन करताना नमूद करण्यात आलं आहे.

तर एकनाथ शिंदे गटाशी निष्ठा जाहीर केलेल्या बंडखोर खासदारांचे म्हणणे आहे की, त्यांनी आपला गट शिवसेनेमध्ये विलय केला आहे आणि माध्यमांमध्ये जसे सांगितले जात आहे तसे ते स्वतंत्र गट नाहीत. शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कळवलं आहे की, बंडखोर खासदारांची आसनव्यवस्था विरोधी बाकांवरून सत्ताधारी बाकांकडे बदलण्यात यावी. अध्यक्षांनी यास मान्यता दिली असून, हा बदल लवकरच संसदीय बुलेटिनमध्ये दिसून येईल, असे आश्वासन दिल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बंडखोर गटाने निवडणूक आयोगला ही पत्र पाठवून कळवले आहे की संसदीय पक्षातील दोन-तृतीयांश सदस्यांनी एकनाथ शिंदे गटात विलय केला असून, त्यामुळे दहाव्या अनुसूचीतील (पक्षांतरविरोधी कायदा) तरतुदी लागू होत नाहीत. बंडखोरांचा दावा आहे की त्यांनी नव्या पक्षात आधीच विलय केला असल्याने त्यांच्या आधीच्या पक्षाने जारी केलेला व्हीप आता त्यांच्यावर लागू होणार नाही.

दरम्यान, काल सकाळीच लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर खासदारांची भेट घेतली. या बैठकीला श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हेही उपस्थित होते, अशीही माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे हे ऑपरेशन टायगर सक्सेस होणार का? याबाबत संभ्रम आहे. मात्र, बंडखोरांनी आपण हे बंड का करत आहोत याचं कारण थेट पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याची भीती हेच असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT