Bhausaheb Wakchaure : शिवसेनेशी गद्दारी; भाऊसाहेब वाकचौरेंना शिवसैनिकांचा इशारा, आधी खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी

Bhausaheb Wakchaure faces Shiv Sena workers' warning: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात आता शिर्डी आणि संगमनेरमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
Shiv Sainiks demand resignation of Bhausaheb Wakchaure
Shiv Sainiks demand resignation of Bhausaheb WakchaureSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT MP Rebellion: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का देत स्वतंत्र गटात सहभागी झाल्याची चर्चा सुरू असलेल्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात आता शिर्डी आणि संगमनेरमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

ठाकरेंच्या शिवसैनिकांनी थेट आक्रमक भूमिका घेत, वाकचौरेंचा प्रतीकात्मक पुतळा दहन करत, धडा शिकवू, मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी वाकचौरे यांच्यावर गंभीर आरोप करत, भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांच्या संभाव्य बंडाची कल्पना आम्ही आधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिली होती. आता आम्ही त्यांना धडा शिकवणार, असा थेट इशारा दिला.

वाकचौरे यांनी पक्ष सोडल्याची माहिती समोर येताच शिर्डीतील (Shirdi) शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते तातडीने एकत्र आले आणि जोरदार निषेध नोंदवला. शहरप्रमुख संजय शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, वाकचौरे यांचा पक्षवाढीसाठी कधीही उपयोग झाला नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांची भूमिका संशयास्पद होती. शिवसेनेने त्यांना दोनदा खासदारकी दिली, पण दोन्ही वेळा त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, असा हल्लाबोल केला.

Shiv Sainiks demand resignation of Bhausaheb Wakchaure
Bhausaheb Wakchaure Wife Reaction : दिल्लीत काय चाललंय? भाऊसाहेब वाकचौरे गायब? पत्नी म्हणाल्या… सकाळपासून संपर्क नाही

उपजिल्हाप्रमुख नानासाहेब बावके यांनीही संताप व्यक्त करत, सामान्य शिवसैनिकांचे मत त्यांच्या विषयी कधीही चांगले नव्हते. त्यांनी कार्यकर्त्यांना कधी विश्वासात घेतले नाही. पक्षाच्या कार्यक्रमांपासून ते कायम दूर राहिले. अलीकडे त्यांचा कल महायुतीतील नेत्यांकडे झुकल्याचे स्पष्ट दिसत होते. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो, असे म्हटले.

Shiv Sainiks demand resignation of Bhausaheb Wakchaure
Sanjay Raut MP Revolt : चार वेळा साईबाबांची शपथ घेतली अन्…; दिल्लीतून संजय राऊतांचा सूचक इशारा, भाऊसाहेब वाकचौरेंवर संशय?

दरम्यान, वाकचौरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होताच संगमनेरमध्ये शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. संगमनेर बसस्थानकासमोर शिवसैनिकांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी आधी पुतळ्याला जोडे मारत निषेध नोंदवला आणि त्यानंतर नाशिक-पुणे महामार्गावर पुतळा जाळून रोष व्यक्त केला.

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे, उपतालुकाप्रमुख राजू सातपुते, अरुण भालेराव, शहरप्रमुख अमित चव्हाण, फैजल सय्यद, शहर संघटक आसिफ तांबोळी, समन्वयक बाळासाहेब घोडके आणि युवा सेनेचे विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले.

राज्यात आधीच चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने, शिवसेना ठाकरे पक्षातील अंतर्गत अस्वस्थता आणि आगामी राजकीय घडामोडींबाबत आता नवी चर्चा सुरू झाली आहे. शिर्डी मतदारसंघात या बंडाचे पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com