Mumbai News : निवडणूक आयोगाच्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी व मनसे आक्रमक झाली असून येत्या काळात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करण्यात आला. विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे.
मतदार यादीत घुसलेले एक कोटी मतदार बाहेर काढण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. निवडणुक आयोगाच्या या घोटाळयाविरोधात आम्ही एकत्र लढाई लढत आहोत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या (MVA) नेतेमंडळींनी दिली आहे.
महाराष्ट्रातील निवडणूक यादीत मोठ्या संख्येने बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर प्रकाश टाकला. या पत्रकार परिषदेस शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर उपस्थित होते.
पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी आपल्या निवडणुकीत वीस हजार मतदार बाहेरून आणून जिंकल्याचे जाहीर व्यासपीठावर सांगितले होते. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही अनेक ठिकाणी अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात 41,000 आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात 35,000 दुबार व बोगस मतदार आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही जिल्ह्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदार नोंदवले गेल्याचे यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष, सत्ताधारी वगळून, स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुका व मतदार याद्यांसाठी संघर्ष करत आहेत. निवडणूक आयोगाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. 1 नोव्हेंबर रोजी, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते करतील, अशी घोषणा करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.