बुलढाणा : नंदुरबार येथील आदिवासी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Padmakar Valvi Joins Congress)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या (ता.17) जळगाव दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात पद्माकर वळवी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
वळवी यांनी आज बुलढाणा येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके उपस्थित होते.
"वळवी यांचे मी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. लवकरच नंदूरबार येथे मोठा कार्यक्रम करून त्यांच्या सहका-यांनाही काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश देण्यात येईल," असे सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवलेले वळवी हे तीन वेळा आमदार झाले आहेत.ते पुन्हा स्वगृही परतले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "पद्माकर वळवी यांच्या काँग्रेस प्रवेशाने नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी ताकद मिळेल. काँग्रेसचा विचार हाच सर्वांना सोबत घेऊन जाणारा तसेच लोकशाही व संविधान अबाधित राखणारा पक्ष आहे. इतर पक्षातूनही आणखी अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ इच्छूक आहेत”.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. मागील आठवड्यात परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी हजारो समर्थकांसह काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह इतर पक्षातील नेत्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दिपक अहिरे तसेच बुलढाणा शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस, इरफान पठाण व काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी वळवी यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
राहुल गांधी हे 2024 मध्ये नंदुरबार दौऱ्यावर असताना, त्याचवेळी पद्माकर वळवी यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवलेले पद्माकर वळवी हे तीन वेळा आमदार झाले आहेत. अनेक दिवसांपासून पद्माकर वळवी हे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरेही उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.