Padmasinh Patil Ranajagjitsinh Patil sarkarnama
महाराष्ट्र

Padmasinh Patil News : 20 वर्षानंतर निर्दोष सुटलेल्या पद्मसिंह पाटलांचा जाहीर सत्कार? राणाजगजितसिंह पाटलांनी खरं काय ते सांगितले...

Padmasinh Patil Ranajagjitsinh Pati : माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, सोशल मीडियामध्ये पद्मसिंह पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार केला जाणार असल्याच्या काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत सत्य काय ते राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Roshan More

Padmasinh Patil News : पवनराजे हत्याकांडातील संशयित आरोपी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, सोशल मीडियामध्ये पद्मसिंह पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार केला जाणार असल्याच्या काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. आता याबाबत पद्मसिंह पाटलांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी याबाबत सत्य काय ते सांगितले आहे.

ते म्हणाले की, 'आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटीलसाहेबांच्या जाहीर सत्काराबाबत अनावधानाने काही सोशल मीडिया व बातम्यांतून वृत्त प्रसारित झाले. मात्र, वस्तुस्थिती अशी की, कोणताही सत्कार कार्यक्रम नियोजित नाही.

तरी डॉक्टर साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व सुज्ञ नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करावे. अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय अशा वृत्तांना पुढे पसरवू नका.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'डाॅक्टर साहेब हे त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे उभे राहू शकत नाही. जे घडलं न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला. त्यांना सहन करावे लागले.'

अर्चना पाटील यांनी देखील निकाल लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला 20 वर्ष सहन करावे लागले. आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागला. निवडणुकीत मी हातात मंगळसुत्र घेत त्याची शपथ घेत सांगितले होते की डाॅक्टरसाहेब निर्दोश आहेत.

पवनराजे हत्याकांड

पवनराजे यांचा कामोठे येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरण माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे प्रमुख आरोपी होते. यांच्यासह या खटल्यात 9 आरोपी होते. . आरोपींमध्ये माफीचा साक्षीदार पारसमल जैन, गुरूर दिग्विजय तिवारी, पिंटू ऊर्फ छोटे पांडे आणि इतरांचा समावेश आहे. मात्र, न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराचा जबाब ग्राह्य धरता येणार नाही, असे सांगत आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT