Girish Mahajan, Pahalgam Terror Attack Sarkarnama
महाराष्ट्र

Pahalgam Terror Attack : महाजनसाहेब, सर्वांना सुखरूप परत आणा… महाराष्ट्र वाट बघतोय!

Girish Mahajan’s Immediate Response and Travel to Srinagar : आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विशेष बैठक घेतली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत तातडीने मदतकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Sampat Devgire

Girish Mahajan News : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मंगळवारी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. काही जण जखमीही झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विशेष बैठक घेतली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत तातडीने मदतकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी जम्मू-काश्मीर सरकार आणि केंद्र शासनाच्या यंत्रणांची समन्वय निर्माण करण्यात आला आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष जबाबदारी टाकली आहे.

गिरीश महाजन श्रीनगर येथे रवाना होणार आहेत. तेथून ते महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना मदत आणि त्यांना महाराष्ट्रात पोहोचविण्यासाठी सुसूत्रता निर्माण करण्याचे काम पाहणार आहेत. महाजन गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. आज नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांचा विविध लोकप्रतिनिधी नेत्यांची मुंबईत भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानंतर मंत्री महाजन यांनी तातडीने रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. दुपारी चारला ते मुंबई येथून श्रीनगर रवाना होणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. महाराष्ट्रातील विविध जखमी आणि अन्य पर्यटक अडकून पडले आहेत. पर्यटकांना आवश्यक ती मदत करणे आणि त्यांना महाराष्ट्रात परत पाठविण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी मंत्री महाजन यांच्यावर आहे.

श्रीनगर विमानतळावर ते या मदत कार्याचा समन्वय करतील. काश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्वच पर्यटकांना सुखरूप पोहोचविणे ही जबाबदारी त्यांच्यावर असेल. त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांचे समन्वयक म्हणून श्रीनगर विमानतळावर कार्यरत राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्यात सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये संजय लेले, दिलीप डिसले, कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा समावेश आहे. या सर्व सहा जणांना तीन टप्प्यात रात्री उशिरापर्यंत पुणे आणि मुंबई येथे पोहोचविण्यात येणार आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक्स वर माहिती दिली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT