Pahalgam Terror Attack : चोराच्या उलट्या बोंबा! पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची धक्कादायक प्रतिक्रिया...

Pakistan’s Official Reaction : Khawaja Asif Points Finger at India : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादी हल्ल्याशी आपल्या देशाचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.
Khawaja Asif, PM Narendra Modi
Khawaja Asif, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Jammu and Kashmir News : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून निषेध व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांची प्रतिक्रिया आली आहे. पहलगाममधील या क्रुर हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटाने घेतली आहे. या हल्ल्यावर आता पाकिस्तानाचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादी हल्ल्याशी आपल्या देशाचा काहीही संबंध नसल्याचे सांगतिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती आसिफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताकडून या हल्ल्यामागे पाकिस्तानाचा हात असल्याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. त्याआधीच पाकिस्तानी मंत्र्यांनी हात वर केले आहेत. तसेच भारतावरच गंभीर आरोप केले आहेत.

Khawaja Asif, PM Narendra Modi
Pahalgam terrorist attack : भ्याड हल्ल्यानंतर ट्रम्प यांचीही तळपायाचाी आग मस्तकात; पाकिस्तानला दणका देण्यासाठी PM मोदींना मिळणार साथ!

आसिफ यांनी म्हटले की, या हल्ल्याशी पाकिस्तानचा कसलाही संबंध नाही. भारतातील नागालँड ते काश्मीर, छत्तीसगढ, मणिपूर आणि दक्षिणेत क्रांती होत आहे. ही परकीय ढवळाढवळ नाही तर स्थानिक बंड आहे, असे मोठे विधान आसिफ यांनी केले आहे. त्यांनी एकप्रकारे भारतावर दहशतवादी हल्ल्याचे खापर फोडले आहे. पण ते एवढ्यावरच थांबले नाही. हिंदुत्वकडेही बोट दाखवले आहे.

आसिफ पुढे म्हणतात की, ‘हे लोक त्यांच्या हक्कांबाबत बोलत आहेत. हिंदुत्ववादी शक्ती अल्पसंख्यांक, ख्रिश्चन, बौध्द, मुस्लिमांना त्रास देत असून त्याचीच ही प्रतिक्रिया आहे.’ आसिफ यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहे. बलुचिस्तानमधील अशांततेला भारत जबाबदार आहे. आम्ही एकदा नव्हे अनेकदा याबाबतचे पुरावे दिले आहेत. पाकिस्तानातील अस्थिरतेमागे भारताचा हात असल्याचा आरोप आसिफ यांनी केला आहे.

Khawaja Asif, PM Narendra Modi
Pahalgam Attack : आठ दिवसांपूर्वीच लग्न, पत्नीसमोरच दहशतवाद्यांनी लेफ्टनंट विनयला घातल्या गोळ्या!

कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला पाकिस्तानचा विरोध असल्याचा दावाही आसिफ यांनी केला आहे. तसेच त्यांनी भारतालाच सल्ला दिला आहे. भारताकडून आपल्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे अशा घटना घडत आहेत. आर्मी किंवा पोलिस लोकांवर अत्याचार करत असतील, त्यांचे मुलभूत हक्क नाकारले जातात आणि पाकिस्तानवर सोयीस्करपणे ठपका ठेवला जातो, असेही आसिफ यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com