Hindu student allegedly forced to offer namaz in college Sarkarnama
महाराष्ट्र

Hindu student forced to offer namaz : खळबळजनक! चार दिवसापूर्वी काॅलेजला प्रवेश; अहिल्यानगरमधील हिंदू विद्यार्थिनीला नमाजासाठी जबरदस्ती!

Palghar Posheri College Hostel Case: पालघर जिल्ह्यातील पोरेशीमधील महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनील नमाजासाठी जबरदस्ती करण्यात आल्याच्या प्रकारने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Student Harassment Case Maharashtra : पालघर जिल्ह्यातील पोशेरी इथं असलेल्या आयडियल फाऊंडेशन काॅलेजच्या फिजिओथेरपी अभ्यास क्रमाकरिता चार दिवसापूर्वी प्रवेश घेतलेल्या एका हिंदू (Hindu) विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी नमाज पढायला लावल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्वतः पालघर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या घटनेची माहिती घेतली. तसेच या प्रकाराबाबत त्यांनी महाविद्यालयातील वसतिगृहाला देखील भेट दिली.

आयडियल फाऊंडेशनच्या उच्च व तंत्र शिक्षणातील विविध विद्या शाखांसाठी विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. चार दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने फिजिओथेरपी अभ्यास क्रमाकरिता प्रवेश घेतला. काॅलेजच्याच वसतिगृहात अन्य विद्यार्थिनीसह ती राहत होती. दरम्यान रविवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान जबरदस्तीने नमाज पढायला लावले.

या प्रकाराने भेदरलेल्या विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या पतीला अन् वडिलांना कळवली. त्यानंतर संबंधित काॅलेज प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित विद्यार्थिनीने पोलिस (Police) ठाण्यात फिर्याद दाखल केली.

आयडियल फाऊंडेशन काॅलेजच्या वसतिगृहावरील महिला अधीक्षक व काही विद्यार्थिनींनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच घडल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयासमोर गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेत तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. वाडा पोलिस तपास करीत आहेत. ‘रॅगिंग’संदर्भातील ही तक्रार समोर आली असून, गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिले आहेत. अशा घटना घडत असतील, तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT