Police initiate inquiry after the unexpected demise of Pankaja Munde’s PA Anant Garje’s wife  sarkarnama
महाराष्ट्र

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, कुटुंबाचा हत्येचा आरोप; मामाने सांगितले धक्कादायक कारण

Anant Garje Wife : पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांचे काही महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. मात्र, मुंबईत त्यांच्या पत्नीने शनिवारी रात्री आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

Roshan More

Crime News : पंकजा मुंडेचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप गर्जे कुटुंबावर आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटु्ंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुलीचे कुटुंबीय वरळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. काही महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.

आत्महत्या तरुणीच्या मामाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, काल दुपारी एक वाजल्यापासून त्यांची भांडणं सुरू होती. अनंत गर्जेचे बाहेर संबध होते. हे तिला माहिती होतं. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. तिने त्याचे चॅटींग देखील पाहिले होते. ते तिच्या वडिलांना पाठवून ठेवले होते. अनंत सांगतोय की तिने माझ्यासमोर आत्महत्या केली. मात्र, आमचा विश्वास नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. माझी बहीण, मुलीचे वडील कालपासून पोलिस ठाण्यात बसून आहे. सामान्य लोकांना न्याय मिळत नाही.

या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. दरम्यान, कुटुंबीय गुन्हा दाखल व्हावा यासाठी आग्रही आहेत. तर, आत्महत्या केलेल्या त्यांच्या मुलीच्या मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे. पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांत त्यांनी अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या झाली आहे, असे सांगत तिच्या माहेरच्या लोकांना वरळी पोलिस ठाण्याला घेरावा घातला. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

(बातमी अपडेच होत आहे)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT