Pankaja Munde News : मंत्री पंकजा मुंडे यांचा सावरगावमधील भगवान भक्तिगडावर दसरा मेळाव्यात मार्गदर्शन केले.माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील यावेळी जोरदार भाषण केले. धनंजय मुंडेंनंतर बोलताना पंकजा यांनी समाजाला उद्देशून आवाहन केले.
त्या म्हणाल्या, 'दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने रहा. नका कुणाचे तुकडे उचलू, नका कुणाचे पैसे घेऊ, नका खोटे कामं करू, खोटे धंदे करू, गुंड-बिंड पाळू नका, काही गरज नाही हे करायची. चांगल्या माणसाचं चांगलंच होतंय. भगवान बाबांचे आशीर्वाद मागे आहेत.'
मेळाव्या दरम्यान काही जण हुल्लडबाजी करत होते, त्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, 'माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्णराज्यातून लोकं येतात. दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून हलक्याने वागणारी लोकं तु्म्ही का आहेत. भगवानबाबांवर श्रद्धा आहे तर धिंगाणा करणारी लोकं माझी असू शकत नाही.'
'जातीवादाचे राक्षस उभे राहत आहेत. जातीपातीचा राक्षस जाळला पाहिजे. शेतकरी अडचणीत आहेत.पण शेतकऱ्यांला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्र सरकार पाठीशी आहे. आमचे मराठा आरक्षणाला पाठींबा आहे. पण आमची पहिल्यापासून भूमिका एकच आहे. आमच्या ताटातून नको.', असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे बॅनर झळकले. बॅनरवर आम्ही वाल्मिकअण्णाला पाठींबा देतो, असा मजकूर होता. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ देखील घोषणबाजी करण्यात येत होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.