
Beed News : मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक नारायणगडावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी हजारो मराठा आंदोलक आणि समर्थक गडावर जमले आहेत. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील ॲम्ब्युलन्समधून नारायण गडावर दाखल झाले. यावेळी त्यांचे गडावर उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे जरांगे पाटील काहीसे भावूक झाले होते तर नारायणगडावर दर्शन घेताच सभेपूर्वीच त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) प्रकृतीच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत. त्यामुळे ते गुरुवारी दुपारी ॲम्ब्युलन्समधून गडावर दाखल झाले. ते गडावर दाखल होताच दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले हजारो मराठा आंदोलक आणि समर्थकानी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
रुग्णवाहिकेतून नारायण गडावर पोहचलेले जरांगे पाटील काहीसे भावूक झाल्याचे पहावयास मिळाले तर नारायणगडावर दर्शन घेतल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले. या दसरा मेळाव्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याने संपूर्ण नारायणगडाचा संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता.
प्रकृती बरी नसतानाही मनोज जरांगे या मेळाव्याला आले. यावेळी त्यांच्या एका हाताला सलाईनची सुई लावलेली दिसली. तसेच त्यांचा चेहरा थकलेला होता. उठतानाही त्यांना त्रास होत होता, असे असूनही जरांगे दसरा मेळाव्यासाठी लोकांना संबोधित करण्यासाठी आले. त्यांनी खुर्चीवर बसूनच जमलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला.
दरम्यान, या मेळाव्यापूर्वी प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी वेळप्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू, पण शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल एवढी मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता या मेळाव्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.