Panvel Municipal Ward Formation Sarkarnama
महाराष्ट्र

Panvel municipal election: महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का : एकाचवेळी गठ्ठाभर उमेदवारांची माघार, भाजपचे 7 जण बिनविरोध

MVA setback Panvel News: पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून ऐनवेळी सात जणांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे सात उमेदवार बिनविरोध निवडून येण्याच्या मार्गावर आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यभरात 29 महापालिका निवडणुकांसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांचे टेन्शन वाढले असतानाच ऐन मोक्याच्या वेळी काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवार हे बिनविरोध विजयी झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान पनवेलमधून मोठी बातमी समोर येत आहे. पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून ऐनवेळी सात जणांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे सात उमेदवार बिनविरोध निवडून येण्याच्या मार्गावर आहेत.

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यामुळे एकीकडे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता पनवेल महापालिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणी महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला असून ऐनवेळी सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याचे समजते.

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत विजयाचे दावे करणाऱ्या महाविकास आघाडीला पनवेलमध्ये अस्तित्वाचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच, आघाडीच्या तब्बल सात उमेदवारांनी अचानकपणे आपली उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या नाट्यमय घडामोडीमुळे भाजपच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पनवेल महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले. शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे नितीन पाटील विजयी झाले आहेत. नितीन पाटील हे पालिकेत भाजपाचे (BJP) स्वीकृत नगरसेवक होते. चार उमेदवारांच्या समोरील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे पनवेल महानगर पालिकेमध्ये भाजपचे रुचिता लोंढे, अजय बहिरा आणि दर्शना भोईर हे निवडणुकीपूर्वीच नगरसेवक झाले आहेत. तर पाली शिंदे यांनी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपचे उमेदवार कांडपिळे बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत.

पनवेलमध्ये महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि इतर घटक पक्ष सहभागी झाले आहेत. पनवेल महापालिकेसाठी दोन्ही प्रमुख आघाड्यांनी 78 जागांचे वाटप जाहीर केले आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक 71 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. शिंदे गटाची शिवसेना 4, अजित पवार गटाची राष्ट्रवादी 2 आणि आरपीआय आठवले गट 1 जागेवर निवडणूक लढवणार आहे.

महाविकास आघाडीत शेकाप 33, ठाकरे गट 19, काँग्रेस 12, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 7, मनसे 2, समाजवादी पार्टी 1, वंचित बहुजन आघाडी 1 आणि इतर घटक पक्ष 3 जागांवर लढणार आहेत. त्यामुळे एकीकडे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता महाविकास आघाडीच्या सात उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे सात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT