Nashik BJP : नाशिक भाजपमध्ये झालेला एबी फॉर्मचा गोंधळ सुनियोजित होता का? शहराध्यक्षांच्या अहवालाने निर्माण झाला प्रश्न

Nashik BJP AB Form controversy : सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबात गेलेल्या चार एबी फॉर्मबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष सुनिल केदार यांना केले होते.

Sudhakar Badgujar, Sunil Kedar
Sudhakar Badgujar, Sunil KedarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : भाजपच्या एबी फॉर्म वाटपात सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबात चार एबी फॉर्म दिले गेले. भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री डेमसे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. तर एकट्या बडगुजर यांच्या कुटुंबात स्वत: सुधाकर बडगुजर व पत्नी आणि मुलाचा अर्ज पात्र ठरला आहे. बडगुजर म्हणतात की त्यांना दुपारनंतर एबी फॉर्म मिळाले तर ते चार एबी फॉर्म दिले कुणी? हा मोठा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण यांच्याकडे अहवाल पाठवला आहे. त्यात सुधाकर बडगुजर यांना चार एबी फॉर्म दिले नाहीत तर व्हिलोळी येथील व्हिल्यात १०८ एबी फॉर्मचे वाटप झाल्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे बडगुजर यांच्याकडे चार एबी फॉर्म गेले असावेत अशी सारवासारव सुनिल केदार यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या अहवालात केली आहे. या अहवालावरुन गोंधळ झाल्याने एबी फॉर्म गहाळ झाले असतील व तेच नेमके बडगुजर यांच्यापर्यंत पोहचले असतील तर झालेला गोंधळ हा सुनियोजित होता का असा संशय घेण्यास जागा आहे.

बडगुजर यांना दुपारनंतर चार एबी फार्म कुणी नेऊन दिले असाही प्रश्न उपस्थितीत केला जाऊ लागला आहे. बडगुजर यांना चार एबी फॉर्म मिळाले होते तर मग त्यांनी अधिक आलेले फॉर्म शहराध्यक्षांकडे परत का केले नाही. भाजप शहराध्यक्ष म्हणतात की गोंधळात हे सगळं झालं. मग हा गोंधळ सुनियोजित कटाचा भाग होता का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थिती केला जाऊ लागला आहे.


Sudhakar Badgujar, Sunil Kedar
Nashik Municipal Election : आमदार सीमा हिरेंच्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री घेतील का? की दुर्लक्षाची पुनरावृत्ती होणार..

कारण नाशिकमध्ये एबी फॉर्मवरुन उडालेल्या गोंधळामुळे भाजपची राज्यभर नाच्चकी झाली आहे. हा ठरवून केलेला गोंधळ होता असा संशय व्यक्त केला जात असून आमदार सीमा हिरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केलेल्या तक्रारीतही या गोष्टी असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्यावर आरोप करताना एकाच घरात तीन उमेदवारी आणि चार एबी फॉर्म कुणामुळे मिळाले. या मागे कोण आहेत याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावरुन आमदार हिरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अंगूलीनिर्देश केल्याचे मानले जात आहे. पक्षातील गैरप्रकारामुळे निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना आमदार हिरे यांनी व्यक्त केली आहे.


Sudhakar Badgujar, Sunil Kedar
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ बरे झाले, ह्रदय शस्त्रक्रियेनंतर प्रथमच नाशिकमध्ये येणार; येताच करणार 'हे' पहिले महत्वाचे काम

त्याचवेळी आमदार हिरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे बडगुजर यांनी म्हटले आहे. एबी फॉर्म वाटपाच्या तक्रारीत मी कुठेच नव्हतो. शहराध्यक्ष आणि कोअर टीममार्फत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळीच फॉर्मचे वाटप झाले. मलाच एबी फॉर्म दुपारनंतर मिळाल्याचे सुधाकर बडगुजर यांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com