MPSC  Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC पूर्व परीक्षेचा पेपर फुटला? नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन

MPSC : लोकसेवा आयोगाकडून मात्र वृत्ताचे खंडन

सरकारनामा ब्युरो

नागपूर : राज्यात आज MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पार पडत आहे. मात्र याच परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले आहे. तसेच या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषदेने (ABVP) सहभाग घेत संबंधित केंद्रप्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. मात्र पेपर फुटल्याच्या वृत्ताचे राज्य लोकसेवा आयोगाने खंडन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हा आरोप करताना एका विद्यार्थ्याने पेपरसुद्धा दाखवला. विद्यार्थ्यांनी सील केलेले पेपर फुटल्याचे दिसले असाही दावा केला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना एक विद्यार्थ्यी म्हणाला, पेपर फोडला तेव्हा केंद्र प्रमुख नव्हते. जेव्हा मला पेपर पारदर्शक कागदात दिसला तेव्हा शंका आली. आम्हाला मोबाईल हॉलमध्ये नेता येत नाही. त्यामुळे खाली येवून बॅगमधून मोबाईल घेतला आणि अभाविपच्या संपर्क साधून माहिती दिली.

अखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत त्यांनी याबाबत विचारणा केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दावा केला की, परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. केंद्र प्रमुखांनी आम्हाला काहीच उत्तर दिले. त्यामुळे अभाविपने ही संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून देत कार्यकर्त्यांनी संबंधित सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्र समोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. तसेच संबंधित केंद्रप्रमुख आणि लिपिकाला निलंबित करा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

दरम्यान, आजच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०२१ चा पेपर फुटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर याबाबत राज्य लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT