नवाब मलिकांचा करिष्मा चालणार? राष्ट्रवादीने सोपवली मोठी जबाबदारी

समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिक देशभरात चर्चेत आले होते.
Nawab Malik in UP
Nawab Malik in UPSarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) णधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही उडी घेतली आहे. राज्यात राष्ट्रवादीने (NCP) समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करत एक जागा मिळवली आहे. याच उमेदवाराच्या प्रचारासाठी मलिकांनी थेट उत्तर प्रदेश गाठलं आहे. त्यामुळे समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरणात देशभरात चर्चेत राहिलेले मलिक पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचा करिष्मा करणार, याबाबत चर्चा रंगली आहे. (UP Election Update)

उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर (Anupshahar) हा विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. या मतदारसंघात के. के. शर्मा (K. K. Sharma) हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडे पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील मोठी जबाबदारीही आहे. समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) त्यांच्याच नावाची पहिली घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याच्या चर्चा होत्या. पण त्या अफवाच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Nawab Malik in UP
काँग्रेसला अजूनही भाजपची भीती; उमेदवारांना थेट मंदिर, चर्चमध्ये नेलं अन्...

राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी शर्मा यांच्या प्रचाराची सुरूवात केली आहे. त्यांनी शनिवारी उत्तर प्रदेश गाठत गाठीभेटींना सुरूवात केली. करौली, अनूपशहर आणि सिरौरा बांगर येथील लोकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच औरंगाबाद-जहांगीराबाद येथील लोकांनाही राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केले. मलिकांनी या दौऱ्यात राष्ट्रवादीसह समाजवादी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराच्या तयारीचा आढावाही घेतला.

दरम्यान, उत्तर प्रदेशात आतापर्यंत समाजवादी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली आहे. मलिकांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, आणखी काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. पण अद्याप याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रवादीला अनूपशहर ही एकमेव जागा मिळाल्याचे चित्र आहे.

शिवसेनेकडूनही उत्तर प्रदेशात निवडणूकीत उतरण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवसेनेने कोणत्याही पक्षाशी युती केली नसून स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहे. राज्यात भाजप आणि समाजवादी पक्ष या दोन पक्षांमध्येच प्रमुख लढत होणार असल्याचे सध्याची स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com