sachin waze sarkarnama
महाराष्ट्र

सचिन वाझे उद्या कोणाची नावे सांगणार? मुंबई गुन्हे शाखा घेणार ताब्यात

तळोजा कारागृह वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सचिन वाझेच्या (sachin waze) प्रकृतीबाबत माहिती न्यायालयाने मागवली होती, त्यानंतर वाझेंचा ताबा देण्यात येत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अँटिलिया स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याला अटक केली आहे. सध्या तो तळोजा कारागृहातील वैद्यकीय वॉर्डमध्ये आहे. गोरेगाव येथील एका गुन्ह्यात त्याचा ताबा मुंबई गुन्हे शाखेला मिळणार आहे.

सचिन वाझे याची नुकतीच हृदय शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. वाझे हा प्रवास करू शकतो, अशी माहिती कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी दिली असून १ नोव्हेंबर रोजी वाझेचा ताबा गुन्हे शाखा घेणार आहे. गोरेगाव येथील एका खंडणी प्रकरणात तपासणीसाठी मुंबई गुन्हे शाखा तपास करणार आहे. या प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे व अन्य काही जण आरोपी आहेत.

तळोजा कारागृह वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सचिन वाझेच्या (sachin waze) प्रकृतीबाबत माहिती न्यायालयाने मागवली होती, त्यानंतर वाझेंचा ताबा देण्यात येत आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने दाखल केलेल्या खंडणी गुन्हात वाझेची चैाकशी होणार आहे. वाझे याचा या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी गुन्हे शाखेने एनआयएच्या विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईमधून दर महिन्याला शंभर कोटीं रुपये वसूल करण्याचे टार्गट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. देशमुख यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे सध्या कुठे आहेत, याविषयी सध्या चर्चा सुरु असताना ते बेल्जियममध्ये असल्याची माहिती कॉग्रेसच्या नेत्याने दिल्याने खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवलं? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का?’ आदी प्रश्न टि्वट करीत त्यांनी परमबीर सिंह यांचा फोटो शेअर केला आहे.

कॉग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा एक फोटो टि्वट केला आहे. यात ते म्हणतात की, ‘हे आहेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त. यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर हप्तावसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंह पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की ते फरार आहेत. आता हे समजलं आहे की ते बेल्जियममध्ये आहेत. परमबीर सिंग बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवलं? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का?’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT