मुंबई : ‘बंटी और बबली' या चित्रपटाचा सिक्कल सोळा वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची नात या चित्रपटात झळकणार आहेत.
'बंटी और बबली 2' हा कॉमेडी चित्रपट आहे. अभिनेता सैफ अली आणि राणी मुखर्जी जवळपास १२ वर्षानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री राणी मुखर्जी, सैफ अली खान यांचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 19 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोठ्या पडद्यावरील पदार्पण करण्यासाठी मोठी मेहनत घेतली असल्याची तिने माध्यमांना सांगितलं.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (minister manohar) यांची नात शर्वरी वाघ ''बंटी और बबली 2''मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या कॉमेडी चित्रपटात शर्वरी वाघ नव्या बबलीच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी व नवोदित अभिनेत्री शर्वरी वाघ (sharvari wagh)यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. शर्वरी ही मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. उद्योगपती शैलेश वाघ शर्वरीचे वडील आहेत.
सोशल मीडियावर शर्वरीच्या (sharvari wagh) फोटोंनी धुमाकूळ घातला असून नेटिझन्सकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे. शर्वरीच्या सोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. . शर्वरीने यापूर्वी ‘प्यार का पंचनामा २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. शर्वरीने अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे.अमेझॉन प्राइमवरील ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून शर्वरी वाघने बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं आहे. पदार्पणातच तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा होत आहे.
मोठी बातमी : मनसेकडून वानखेडेंना शुभेच्छा
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal director Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. वानखेडे यांची चैाकशी मुंबई पोलिस करणार आहेत. वानखेडे-मलिक आरोप-प्रत्यारोपावरुन राजकारण पेटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वानखेडेंना समर्थन दिले आहे. आता या प्रकरणात मनसेनं उडी घेतल्याचे दिसते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (mns leaders Sandeep Deshpande) शनिवारी सकाळी टि्वट करीत समीर वानखेडेंना शुभेच्छा दिल्या असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.