Param Bir Singh  Sarkarnama
महाराष्ट्र

परमबीर सिंहांना चांदीवाल आयोगाचा दणका ; हजर राहा, अन्यथा कारवाई

चांदिवाल आयोगाने (chandiwal commission) यापूर्वी परमबीरविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. परमबीर सिंह हे हजर झाले नाही. त्यांना हजर राहण्यास चांदीवाल समितीने सांगितलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांना फरार म्हणून घोषित केल्यानंतर ते दोन दिवसापूर्वी मुंबईत गुन्हे शाखेत हजर झाले आहेत. ३२१ दिवसांनी परमबीर सिंह (Parambir singh) यांचे 'दर्शन' झाल्यानंतर तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चैाकशी होत आहे. या प्रकरणाची चैाकशी चांदीवाल समितीही (chandiwal commission) करीत आहे.

मुंबई आणि ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात पाच खडणीच्या प्रकरणांची तक्रार आहे. या खंडणी वसुलीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासोबतच सहाजण आरोपी आहेत. त्यामध्ये सचिन वाझेंच्या नावाचाही समावेश आहे. सचिन वाझेंना या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईच्या किला कोर्टाने परमबीर सिंह यांना खंडणी प्रकरणात फरार घोषित केले आहे.

चांदिवाल आयोगाने यापूर्वी परमबीरविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह हे हजर झाले नाही. त्यांना हजर राहण्यास चांदीवाल समितीने (chandiwal commission) सांगितलं आहे. ''हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील,'' असा इशारा न्या. चांदिवाल यांनी शनिवारी दिला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांच्या वकीलांने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. परमबीर सिंह हे स्वतःच सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या यामध्येही ढवळाढवळ करत होते असाही आरोप त्यांनी केला होता. अँटेलिया प्रकरण समोर आल्यानंतर आणि त्यातला सचिन वाझेचा सहभाग आणि इतर सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाने समोर आणल्या. ज्यानंतर त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आणि त्यांना डी.जी. होमगार्ड हे पद दिलं.

परमबीर सिंह गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता होते. अखेर बुधवारी परमबीर सिंह यांचा मोबाईल चालु झाला आणि आता मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सिंह यांना फरार घोषित केल्यावर ते समोर आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT