Prakash Ambedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Parbhani municipal elections : प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर 'सर्जिकल स्ट्राईक' ! मतदारांवरून दाखवला आरसा; म्हणाले,'आता जनाधार राहिला...'

Vanchit Bahujan Aghadi campaign News : परभणी महापालिकेच्या प्रचार सभेवेळी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या मतदारांबाबत मोठा दावा केला असून मतदारांवरून निवडणुकीपूर्वीच त्यांनी आरसा दाखवला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. नेतेमंडळी प्रचारासाठी आता बाहेर पडले आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने वातावरण तापण्यास सुरुवात झाले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच आता परभणी येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी गेलेल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. परभणी महापालिकेच्या प्रचार सभेवेळी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या मतदारांबाबत मोठा दावा केला असून मतदारांवरून निवडणुकीपूर्वीच त्यांनी आरसा दाखवला आहे.

परभणी येथील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘काँग्रेसकडे (Congress) आता मतदार उरला नाही. केवळ मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहिला आहे. तुम्ही इतके दिवस शरद पवारांच्या नादी लागल्याने तुमची अशी अवस्था झाली आहे. बाबाजानी यांनी खतीब यांचा उपयोग करून घेतला आहे. ते आता काँग्रेसचीच वाट लावायला निघालेत, अशी टीका आंबेडकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजाणी दुर्राणी यांच्यावर केली.

परभणी येथील मुस्लिम मतदारांना आवाहन करीत आहे की, काँग्रेसकडे आता काहीच शिल्लक राहिले नाही. फक्त मुस्लिम मतदार उरला आहे. आता काँग्रेसकडे मतदार उरलेला नाही, तेव्हा उद्याच्या व्यवस्थेमध्ये संविधान टिकले पाहिजे, असे वाटत असेल तर मुस्लिमांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केले.

येथील सभेनंतर पत्रकाराशी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) म्हणाले की, भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला यांना संपवता येईल, असे त्यांना वाटत आहे. म्हणून त्यांनी महायुती केली नाही. सत्ता आली नाही की पक्ष संपतात, अशी परिस्थिती आहे. सगळीकडे अजित पवार युतीतून वेगळे लढत आहेत. मुस्लिमांचे मत विभाजन करण्याच ते बघत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

यावेळी त्यांना बिनविरोध नगरसेवकांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, ' राज्यात हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे. आमदारांनी उमेदवारांना दमदाटी करून पळवले आहे. काही ठिकाणी विकत घेतले आहे. अर्ज माघारी घेण्याची सिस्टीम आता बंद केली पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. तरच लोकशाही टिकेल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT