Shivsena Congress Alliance : एकनाथ शिंदेंना काँग्रेसची मदत, छुपी युती...; आमदार नरेंद्र मेहतांच्या आरोपाने खळबळ

Narendra Mehta Vs Eknath Shinde Shivsena : भाईंदर पश्चिम येथील प्रभाग ८ मध्ये काँग्रेसने चार जागांपैकी दोनच जागांवर उमेदवार दिले आणि शिवसेनेने देखील या प्रभागात दोनच उमेदवार दिले आहेत.
Narendra Mehta Vs Eknath Shinde
Narendra Mehta Vs Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Narendra Mehta News : मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी काँग्रेस व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीछुपी युती झाली असल्याचा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. शिवसेनेचे काही उमेदवार सुरक्षित करण्यासाठी काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार मागे घेतले. एखाद्या राजकीय पक्षाने एबी फॉर्म दिलेले आपले अधिकृत उमेदवार मागे घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही मेहता यांनी सांगितले. काँग्रेसने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झीनत कुरेशी व दीपक बागरी या काँग्रेसच्या दोन अधिकृत उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली. त्याचप्रमाणे अन्य काही प्रभागातही काँगेसचे उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

भाईंदर पश्चिम येथील प्रभाग ८ मध्ये काँग्रेसने चार जागांपैकी दोनच जागांवर उमेदवार दिले आणि शिवसेनेने देखील या प्रभागात दोनच उमेदवार दिले आहेत. यासाठी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने आपला अधिकृत उमेदवार मागे घेतला, भाईंदर पूर्व भागातही काँग्रेसने आपली एकमेव उमेदवारी मागे घेतली तर शिवसेनेने देखील काँग्रेसचा प्रभाव असलेल्या मिरा रोडच्या प्रभागात उमेदवारच दिलेले नाहीत . यावरून दोघांमध्ये अघोषित युती झाली असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा आरोप मेहता यांनी केला.

Narendra Mehta Vs Eknath Shinde
Thackeray Brothers Campaign : 'ठाकरे ब्रँड' मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कसा उडणार प्रचाराचा धुराळा? जाणून घ्या, एकाच क्लिकवर

या छुप्या युतीला भाजप घाबरत नाही. मिरा भाईंदरमध्ये भाजपला जनाधार आहे आणि त्याच जोरावर भाजप ७० हुन अधिक जागा जिंकेल असा दावा देखील नरेंद्र मेहता यांनी केला.

काँग्रेसने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. मविआ मधील घटक पक्षांच्या बैठकीत काँग्रेसचा प्रभाव असलेल्या ४० ते ४५ जागा मागितल्या होत्या मात्र जागावाटपावर एकमत झाले नाही. त्यामुळे ज्या जागा कॉंग्रेसने मागितल्या होत्या त्याच जागा काँग्रेसने कायम ठेवल्या व उर्वरित जागेवरील उमेदवार मागे घेतले असा खुलासा काँग्रेसचे प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी केला.

शिदेंची शिवसेना भाजपसाठी डोकेदुखी

निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे त्यामुळेच भाजप असे हास्यास्पद आरोप करत आहे, असा टोलाही मुझफ्फर हुसेन यांनी लगावला. या आरोप प्रत्यारोपांवरून भाजप व शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील दरी आणखी रुंदावत आसल्याचे दिसून येत आहे.

Narendra Mehta Vs Eknath Shinde
Congress Support Thackeray : वंचित-काँग्रेसची थेट ठाकरे बंधूंना मदत, नव्या रणनीतीमुळे भाजप टेन्शनमध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com