Parth Pawar, Sunil Tatkare, Praful Patel Sarkarnama
महाराष्ट्र

Parth Pawar news : प्रफुल पटेल, तटकरेंबाबत चर्चांना उधाण; पार्थ पवार पहिल्यांदाच थेट बोलले…

NCP internal developments : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे पद नमूद न करण्यात आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

Rajanand More

NCP leadership discussion : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या आज संसदेतही होत्या. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिसले नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाने पाठविलेले एक पत्र समोर आल्यानंतर या घडामोडी घडल्याने चर्चांना उधाण आले आहे.

प्रफुल पटेल आणि तटकरेंबाबत तर्कवितर्क लढविले जात असतानाच राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. पक्षातील घडामोडींबाबत पार्थ पवार यांनी पहिल्यांदाच उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.

काय म्हणाले पार्थ पवार?

पार्थ पवार यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. पटेल आणि तटकरे यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना वादात ओढणे दुर्देवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबतच्या आधारहीन बातम्या आणि तर्कवितर्कपूर्ण नॅरेटिव्ह पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यांची अनेक दशकांची अविरत बांधिलकी आणि नेतृत्व आम्हा सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करत आले आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना वादामध्ये ओढणे, अत्यंत दुर्दैवी आहे, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे पद नमूद न करण्यात आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. पटेल यांचे अधिकार काढून घेतले का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर हे पत्र आयोगाला पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांच्या नावासमोर अध्यक्ष असा उल्लेख आहे.

त्यानंतर आज सुनेत्रा पवार संसदेत गेलेल्या असताना त्यांच्यासोबत पटेल आणि तटकरे हे दोन्ही नेते दिसले नाहीत. खरंतर सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. दोन्ही नेते अनुक्रमे राज्यसभा व लोकसभेचे सदस्य आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा संसदेत आलेल्या असताना त्यांच्या अनुपस्थितीमुळे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. याबाबत चर्चांना उधाण आलेले असतानाच पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT