Sunetra Pawar in Delhi : मोठी घडामोड : प्रफुल पटेलांबाबत चर्चांना उधाण आलेले असतानाच सुनेत्रा पवार दिल्लीत; अमोल कोल्हेंची अचानक भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्लीत असून त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लढविणार आहेत.
Sunetra Pawar in Delhi
Sunetra Pawar in DelhiSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे पद नमूद करण्यात आलेले नाही. केवळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर अध्यक्ष असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटविण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्याने आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीत असून त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लढविणार आहेत. त्याआधी त्या राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत. प्रफुल पटेल हे राज्यसभेचे तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे लोकसभेचे खासदार आहे. सध्या संसदेचे अधिवेशनही सुरू आहे. त्यानंतरही हे दोन्ही नेते सुनेत्रा पवार यांंच्यासोबत दिसून आले नसल्याचे सांगितले जात आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दाखल झालेल्या सुनेत्रा पवार पटेल आणि तटकरे यांच्याशी सध्याच्या घडामोडींवर चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, दिल्लीत दाखल झालेल्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल न दिसल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांना पत्रकारांनी प्रफुल पटेल सोबत का नाहीत, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी पटेल केव्हा येतात, केव्हा जातात हे तुम्हालाच माहीत, असे उत्तर दिल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनी दिले आहे.

Sunetra Pawar in Delhi
Supreme Court : खळबळजनक घटना, अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले! सरन्यायाधीश प्रचंड संतापले, स्वत: मध्यरात्री 2 वाजेपर्यंत होते लक्ष ठेऊन...

दरम्यान, सुनेत्रा पवार यांची दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचीही भेट झाली. ही भेट पुर्वनियोजित नव्हती. दोघांची अचानक भेट झाली असली तरी त्यांच्यात काहीतरी संवाद झाल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यामुळे दिल्लीतील या घडामोडींना महत्व प्राप्त झाले आहे.

Sunetra Pawar in Delhi
Assembly Election Voting : धक्कादायक : निवडणुकीत मध्यरात्री तब्बल 17 लाख मतदान; याच मतांमुळे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचा दावा

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेचा वाद समोर आला होता. अजित पवार यांनी विलीनीकरणासाठी चर्चा सुरू केल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी केला होता. मात्र पटेल, तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला होता. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाने पाठविलेले पत्र समोर आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com