Raghunathdada Patil, K Chandrashekhar Rao sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara BRS News : साताऱ्यातील शेतकरी संघटना बीआरएससोबत; केसीआर यांच्या सत्काराला ११ हजार कार्यकर्ते जाणार

Umesh Bambare-Patil

Satara BRS News : शेतकरी हिताचे निर्णय घेणारा बीआरएस पक्षाने आपकी बार किसान सरकार...चा नारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारला बीआरएसच्या माध्यमातून उखडून टाकणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

सातारा शासकीय विश्रामगृहांत भारत राष्ट्रीय समितीची BRS बैठक रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रघुनाथदादा म्हणाले, येत्या नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के .सी राव K chandrashekhar Rao यांचा इस्लामपूर येथे सत्काराचे आयोजन केले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातून ११ हजार कार्यकर्ते जाणार आहेत.

क्रांती दिनाच्या दिवशी अन्याय करणारे राज्यकर्ते चले जावो.. असा नारा चंद्रशेखर राव देणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे संघटन एकवटणार आहे. तेलंगातील शेतकऱ्यांना १९ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्यात आले. तर महाराष्ट्रात शंभर दिवसांत १७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या कर्जबाजारीपणातून झाल्या आहेत. या विषयावर काम होणे गरजेचे असताना वेगळेच राजकीय विषय पुढे आणून दिशाभूल करण्याचे काम होत आहे.

केसीराव यांचा पक्ष स्वीकारण्यामागचे कारण म्हणजे ते शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत. भारत राष्ट्र समितीने आपकी बार किसान सरकारचा नारा दिला आहे. त्यामुळे आम्ही तन-मन-धनाने त्यांच्यासोबत आहोत. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्र व राज्य सरकारला उखडून टाकणार असल्याचा इशारा रघुनाथदादा यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT