K Chandrashekar Rao: आम्हाला भाजपची 'बी टीम' म्हणणाऱ्या पवारांच्या पक्षाची अवस्था काय? के.चंद्रशेखर राव यांचा पलटवार

BRS Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
K Chandrashekar Rao
K Chandrashekar RaoSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करत "आम्हाला भाजपाची बी टीम म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था काय आहे, असा खोचक सवाल करत पवारांवर पलटवार केला. के.चंद्रशेखर राव हे मंगळवारी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली.

देशातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या आघाडीत आपण नसून तिसऱ्या आघाडीचे संकेतही के चंद्रशेखर राव यांनी दिले. "आम्ही 'इंडिया' आणि 'एनडीए' दोघांबरोबरही नाहीत. आम्ही तिसरी आघाडी म्हणून काम करू. काँग्रेसने 60 वर्षे आणि 'एनडीए'ने 10 वर्षे सत्ता भोगली. मात्र, लोकांसाठी काहीही काम केले नाही", असे म्हणत राव यांनी भाजपसह काँग्रेसवरही निशाणा साधला.

K Chandrashekar Rao
Protest Against Bhide Guruji: पिंपरीत काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचेही भिडे गुरुजींविरोधात आंदोलन; तत्काळ अटक करण्याची मागणी

पुढे बोलताना के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. "महाराष्ट्रात साधन सामग्री भरपूर आहे. मात्र, त्याचा उपयोग व्यवस्थित झालेला नाही. महाराष्ट्रातील एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचा येथीलच एका अधिकाऱ्याचा अहवाल आहे".

K Chandrashekar Rao
KCR In Maharashtra : अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देणारच; केसीआर यांची गर्जना

"महाराष्ट्रात तेलंगना पॅटर्न राबवा, अशी आमची मागणी आहे. मात्र, राज्य सरकार राबवत नाही. सरकारला शेतकऱ्याबद्दल दया नाही. भारत राष्ट्र समिती ही शेतकरी, तरुण आणि दलितांसाठी काम करणार असून आमच्या पक्षाची धोरणं ऐकून अनेकांनी आमच्याशी संपर्क केला. 14 लाख सदस्य महाराष्ट्रात झाले आहेत", असंही त्यांनी सांगितले.

भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात पक्ष संघटना हळहळू वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'बीआरएस' अर्थात भारत राष्ट्र समिती हा पक्ष भाजपची 'बी टीम' असल्याची टीका करण्यात आली होती. या टीकेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि 'बीआरएस'चे प्रमुख के.चंद्रशेखर राव यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटींवरच भाष्य केले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com