प्रचंड वीज व पायाभूत नुकसान – सोलापूर जिल्ह्यातील 72 मंडलांमध्ये अतिवृष्टीमुळे 1,400 वीज डीपी वाहून गेल्या, 81 गावांची वीज खंडित झाली आणि दुरुस्तीसाठी 20-30 कोटी रुपयांची गरज आहे.
मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त कुटुंबे व जनावरे – साडेबारा हजार कुटुंबे थेट बाधित, 45 हजारांहून अधिकांना फटका, तर 18 हजार जनावरे प्रभावित; चारा, अन्नधान्य आणि तातडीची रोख मदत सुरू.
सरकारची मदत व उपाययोजना – कुटुंबनिहाय मदत, पंचनामे, रस्ते दुरुस्तीकरिता 4 कोटी मंजूर, पूर्णपणे पडलेल्या घरांना 1.3 लाखांची मदत; कर्जवसुली तात्पुरती थांबवून जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा निर्धार.
Solapur, 29 September : सोलापूर जिल्ह्यातील 110 मंडलांपैकी 72 मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सीना नदीच्या पुराच्या पाण्यात 1400 डीपी वाहून गेल्या आहेत. तर 81 गावांची लाईट खंडित झाली होती. त्यातील 27 गावं सोडली, तर बाकीच्या गावांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्याची वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी साधारण 20 ते 30 कोटी रुपये लागणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पूरग्रस्तांच्या मदतीचा आढावा घेतल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महावितरण कंपनीच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. ते म्हणाले, सीना नदीपात्रातून 1 लाख 55 हजार क्युसेकने विसर्ग केला आहे. सध्या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट असल्याने पुराचा धोका टळला आहे. पुरात साडेबारा हजार कुटुंबं बाधित झाली असून आणि 45 हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना फटका बसलेला आहे.
पुरामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील साडेअठरा हजार जनावरे बाधित आहेत. मागील दोन दिवसात छत्रपती संभाजीनगर आणि सातारा जिल्ह्यातून चारा मागवला असून पूरग्रस्तांच्या जनावरांना चारा पोचवली जात आहे. लोकांचा संसार सुरळीत होण्यासाठी किमान महिना लागणार आहे. बाधित कुटुंबीयांना दिवाळीच्या अनुषंगाने महिनाभर पुरेल एवढं अन्नाधान्यासहित सर्व गरजेच्या वस्तू पुरवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असेही गोरे यांनी नमूद केले.
जयकुमार गोरे म्हणाले, सर्व सेवाभावी संस्था आणि मोठ्या उद्योजकांना विनंती करतो की पूरग्रस्तच्या पाठीशी उभं राहावा. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. PWD, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना सूचना केल्या असून अनेक गावांचा संपर्क जोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नदीकाठच्या भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. अक्कलकोट, करमाळा, माळशिरस, सांगोला तालुक्यात पंचनामे होता आहेत. मात्र, माढा, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात अद्याप पाणी असल्याने पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत.
वेळ पडली तर बाहेरच्या जिल्ह्यांतून mseb चा स्टाफ आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कुटुंबनिहाय मदत पोहोचली पाहिजे, याची व्यवस्था प्रशासन म्हणून आम्ही करतो आहोत, त्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे. उद्यापासून 10 हजार रुपये ही तातडीची मदत ज्यांचे घर पडले आहे, त्यांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, शेतकऱ्यांना शासन तुटपुंजी नव्हे; तर प्राथमिक मदत दिली जात आहे. शासन हे जास्तीत जास्त मदत देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. राज्य आणि केंद्र शासन मिळून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. सीना कोळेगाव विसर्गाच्या संदर्भात मागच्या 50 वर्षांत सोलापूर जिल्ह्यात असा पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे हे अस्मानी संकट आहे. यामध्ये कांही चुका झालेल्या असतील तर चौकशी करुन कारवाई करता येईल
जी घर 100 टक्के पडलेली आहेत, त्यांना 1 लाख 30 हजारांची मदत मिळेन. मात्र, त्यातही अधिकची मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील. तत्पूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी डीपीसीतून मी 4 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे, असेही गोरे यांनी सांगितले.
कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी
शरद पवार यांनी कर्ज वसुलीबाबत केलेल्या विधानावर जयकुमार गोरे म्हणाले, पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना विनंती आहे की ही वेळ ती नाही. कर्जवसुली आपण थांबावली आहे. मात्र, योग्यवेळी सरकार कर्जमाफीचा निर्णय करेल, असा आशावादही गोरे यांनी बोलून दाखवला आहे.
प्र: पुरामुळे किती गावांमध्ये वीज खंडित झाली होती?
उ: 81 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यातील बहुतेक ठिकाणी वीज परत आली आहे.
प्र: जिल्ह्यातील वीज वितरण पुन्हा सुरू करण्यासाठी किती निधी लागणार आहे?
उ: साधारण 20 ते 30 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
प्र: पूरग्रस्त कुटुंबांना सरकारकडून कोणती तातडीची मदत दिली जाते?
उ: ज्या कुटुंबांचे घर पडले आहे त्यांना 10 हजार रुपयांची तात्काळ मदत आणि पूर्णपणे पडलेल्या घरांसाठी 1.3 लाखांची मदत मिळणार आहे.
प्र: शरद पवारांच्या कर्जवसुलीवरील विधानाबाबत जयकुमार गोरे यांनी काय सांगितले?
उ: कर्जवसुली आधीच थांबवली असून योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.