Kalamba Central Jail sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kalamba Central Jail : आंघोळीला गेला अन् घात झाला; 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोल्हापुरातील कारागृहात खून

Akshay Sabale

Kolhapur News, 2 June : कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात ( Kalamba Cenetral Jail ) एका कैद्याचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन गटातील मारहाणीत कैद्याचा खून झाला आहे. पाच जणांनी मिळून कैद्याला जबरदस्त मारहाण केली आहे. यात कैद्याचा मृत्यू झाला आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता, असं खून झालेल्या कैद्याचं नाव आहे.

मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. तो कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान हा हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. तेव्हा, त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मुन्नावर हल्ला केला. या हल्ल्यात मुन्नाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, काही महिन्यांत कळंबा कारागृहातील कैद्यांकडे 80 पेक्षा अधिक मोबाईल आढळले होते. याप्रकरणी कारागृहाती दोन अधिकाऱ्यांसह 9 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली होती. तर, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT