Kolhapur Exit Poll : कोल्हापुरात 25 वर्षांनी 'हात' उंचावणार? ; शाहू छत्रपतींची दिल्लीकडे कूच!

Chhatrapati Shahu Maharaj and Sanjay Mandalik : कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे पहिल्यांदाच सार्वजनिक लोकसभा निवडणुकीत उतरल्यानंतर कोल्हापूर लोकसभेची लढत तुल्यबळ बनली होती.
Chhatrapati Shahu Maharaj Vs Sanjay Mandalik
Chhatrapati Shahu Maharaj Vs Sanjay MandalikSarkarnama

Lok Sabha exit poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा शनिवारी पार पडला. आता सर्वांनाच 4 जून रोजीच्या निकालाची उत्सुकता आहे. तत्पुर्वी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दर्शवले आहे.

शाहू महाराज छत्रपती आणि खासदार संजय मंडलिक यांच्यातील दुरंगी लढतीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयाचे दावेदार ठरत आहेत. तर महायुतीमधील भाजपचे खासदार संजय मंडलिक पिछाडीवर पडल्याचे एक्झिट पोल मध्ये दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे पहिल्यांदाच सार्वजनिक लोकसभा निवडणुकीत उतरल्यानंतर कोल्हापूर लोकसभेची लढत तुल्यबळ बनली होती. खासदार संजय मंडलिक हे दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांचे नाव एक्झिट पोलनुसार आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. राज्यातील सत्तापालटानंतर राज्यातील सर्वच पक्षात खळबळ माजली. त्यातच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. तर त्यांच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट, आरपीआय यांनी एकत्रित महायुतीची मोट बांधली व लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. आता मतदानाचे सर्व टप्पे झाले असून केवळ निकालाची सर्वांनी प्रतीक्षा आहे.

Chhatrapati Shahu Maharaj Vs Sanjay Mandalik
Thane Lok Sabha Exit Poll : नरेश म्हस्के ठाण्यातच घालवणार एकनाथ शिंदेंचं नाव?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांचे नाव एक्झिट पोलनुसार आघाडीवर असल्याचे समोर येते. खासदार संजय मंडलिक यांच्याबाबत असणारी नाराजी, कमी जनसंपर्क, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनता काही अंशी नाराज असल्याचे सांगितले जाते. अशातच शाहू महाराज छत्रपती हे राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज असल्याने त्यांच्याप्रती असणारा आदर आणि अस्मिता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने कौल दिल्याचे दिसत आहे.

Chhatrapati Shahu Maharaj Vs Sanjay Mandalik
Maval Lok Sabha Exit Poll : ठाकरेंनी वाघेरेंना धाडले; पण मावळात बारणेंचीच डरकाळी ?

शिवाय काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांचे मिळालेले पाठबळ हे शाहू छत्रपतींसाठी महत्वाचे ठरल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात चार जून रोजी मतमोजणी होणार असली तरी एक्झिट पोल नुसार शाहू महाराज छत्रपती हे विजय होतील असे एक्झिट पोलनुसार दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com