Pratapgad fort lesser Show
Pratapgad fort lesser Show sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Beautification of forts : प्रतापगड विकासाचा २०० कोटींचा आराखडा...

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा जिल्ह्यातील गड-किल्‍ल्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी प्रतापगडावर विकासात्मक कामांसाठी २०० कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. अजिंक्यतारा किल्‍ल्यासाठीही १०० कोटींचा आराखडा तयार केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.

प्रतापगडावर आज ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले,‘‘अजिंक्यतारा व प्रतापगडाच्या सुशोभीकरण आराखडा सादर केला आहे. यामध्ये गडांवर नागरिकांसाठी ऐतिहसिक माहिती व साहित्य जतन करावे, यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार केला जाईल.

दरम्यान, शिवप्रतापदिनाच्या सोहळ्यात पहाटे साडेसहा वाजता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते भवानीमातेला अभिषेक व पूजा करण्यात आली. प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त संपूर्ण गडाला विद्युत रोषणाई केली असून विविध ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट केली आहे. याचबरोबर गडावर लेझर शो व विद्युत रोषणाईद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्‍या केलेल्‍या वधाचे दृश्‍‍य दाखविण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT