Rahul Gandhi : राहुल गांधी प्रतापगड किल्ल्यास भेट देणार

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेच्या समारोपानंतर या भेटीची वेळ निश्चित केली जाणार आहे.
Pratapgad Fort, Rahul Gandhi, Congress
Pratapgad Fort, Rahul Gandhi, CongressSarkarnama

निमसोड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलक्षण बुद्धिचातुर्य व अतुलनीय शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले प्रतापगडास काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी लवकरच भेट देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व हरणाई सहकारी सूत गिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.

भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासात राहुल गांधीं राज्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवर्जून भेटले. त्यांच्याकडून राहुल गांधींनी राज्यातील संघटनात्मक, राजकीय व सामाजिक विषय समजून घेतले. महाराष्ट्राची संस्कृती व विचारधारा याविषयांवरही राहुल गांधींनी अभ्यासकांकडून माहिती घेतली.

रणजितसिंह देशमुख भारत जोडो यात्रेच्या नियोजन व अंमलबजावणी कामातील सक्रिय पदाधिकारी होते. या दरम्यान राहुल गांधींशी त्यांचा अनेकदा संपर्क झाला. भारत जोडो यात्रेच्या अंतिम टप्प्यात रणजितसिंह देशमुख यांनी राहुल गांधींना प्रतापगड किल्ल्यास भेटीचे लेखी निवेदन दिले.

Pratapgad Fort, Rahul Gandhi, Congress
Bharat Jodo : विस्कटलेले दलित, मुस्लीम, आदिवासी आणि ओबीसी ही यात्रा जोडेल का?

प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पाहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केल्याचे राहुल गांधींना सांगून नेहरुंनी प्रतापगडला दिलेल्या ऐतिहासिक भेटीचे उमटलेले दीर्घकालीन पडसादही त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Pratapgad Fort, Rahul Gandhi, Congress
महाराष्ट्राला भावला राहुल गांधींचा साधेपणा, भारत जोडो यात्रा ठरणार परिवर्तनाची नांदी…

राहुल गांधींनी प्रतापगड किल्ल्यास भेटीचे निमंत्रण स्वीकारले असून भारत जोडो यात्रेच्या समारोपानंतर या भेटीची वेळ निश्चित केली जाणार आहे. यामध्ये प्रतापगड किल्ल्याला भेट, तेथील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन, भवानी देवीचे दर्शन आदी कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

Pratapgad Fort, Rahul Gandhi, Congress
Wai : प्रतापगड उत्सव समितीच्या २५ वर्षांच्या लढ्याला यश; पेढे वाटून आनंदोत्सव...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com