Nilesh More, satara shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Shivsena News: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना २९ लाखांची मदत...

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने फेब्रुवारी २०२३ मध्ये विक्रमी दहा कोटी २७ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्ण सेवेत उत्कृष्ठ कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेना Satara Shivsena वैद्यकिय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde फाऊंडेशनचे सातारा जिल्हा संपर्क प्रमूख निलेश मोरे Nilesh More यांनी गेल्या पाच महिन्यात सातारा जिल्ह्यातील ४७ रुग्णांना तब्बल २९ लाखांची आर्थिक मदत मिळवुन दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने फेब्रुवारी 2023 मधे विक्रमी दहा कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. त्यामध्ये सातारामधील निलेश मोरे यांचाही मोठा वाटा राहिलेला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी व्यतिरिक्त राज्यातील धर्मादाय संस्था, वैद्यकीय उपचारासाठी मदत करणाऱ्या संस्था यांच्याशी संपर्क करुन निलेश मोरे यांनी मदत मिळवून दिली आहे.

निलेश मोरे यांनी ४७ रूग्णांना विविध आजाराबाबत तब्बल २९ लाखांची मदत मिळवून दिली आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध हॉस्पिटल मध्ये रूग्णांना व्यवस्थित उपचार व्हावेत यासह सवलत मिळवून देण्यासाठी निलेश मोरे यांचे संपर्क कार्यालयातून मदत केली जाते. रुग्णांनी आपल्या आजाराबाबत अथवा आर्थिक मदतीसाठी निलेश सुभाष मोरे यांचे संपर्क कार्यालय ५७/१ गीते बिल्डिंग, रविवार पेठ, सातारा येथील आरोग्य सहाय्यक यांच्याशी 9922277774 /9096076644 या क्रमांकावर संपर्क करावा.

शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष चे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे सर तसेच कश्य प्रमूख राम राऊंत सर जिल्हाप्रमुख दिपक चव्हाण असे सर्व पदाधिकारी मिळून प्रत्येक रुग्ण पर्यंत मदत मिळवुन दिली जाते. जिल्ह्यातील एकही सर्वसामान्य गोरगरीब गरजू रुग्ण पैसे अभावी उपचारविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशीच दिला होता. त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रूग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मिळून प्रामाणिक प्रयत्न करत आहे. असे निलेश मोरे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT