Gokul Dudh Sangh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : ना महायुती, ना महाविकास आघाडी : स्थानिक राजकीय वादातून 31 संस्थांनी फिरवली ‘गोकुळ’कडे पाठ!

Local Political Disputes : गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी ठराव मिळविण्याची चुरस संपली. मात्र, स्थानिक वादांमुळे 31 सदस्य संस्थांनी कोणत्याही गटाला ठराव सादर न केल्याचे समोर आले.

Rahul Gadkar

Kolhapur, 03 July : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठराव दाखल करण्यासाठी नेत्यांची स्पर्धा लागली होती. संस्थेचा ठराव आपल्याकडेच यावा, यासाठी जवळपास पाच लाखांची बोली लावली जात होती. अखेर ठराव दाखल करण्याची मुदत संपल्याने ठराव पळवा पळवीची स्पर्धाही थांबली आहे. मात्र, गोकुळ दूध संघांमधील 31 संस्था अशा आहेत, ज्यांना कोणत्याच राजकारणात रस नाही. ना कोणता नेता नको ना कोणतं राजकारण नको. स्थानिक वादाच्या कारणातून या 31 संस्थानी ठरावच दाखल केले नसल्याचे समोर आले आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने 15 जूनपासून ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एक जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत होती. जवळपास 17 दिवसांत 4844 संस्था मतदानास पात्र असताना 5439 ठराव सहाय्यक दुग्ध निबंध कार्यालय कोल्हापूर येथे प्राप्त झाले. यामध्ये 57 ठरावधारकाने दुबार ठराव दाखल केले आहेत. ठराव गोळा करत असताना सर्वच माजी संचालक राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा दिसून आली.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत हे ठराव दाखल केले आहेत. गावागावांत सुरू झालेली ईर्षा, त्यामुळे ठरावाला लाखांची बोली आली. राधानगरी तालुक्यातील एका ठरावाला जवळपास पाच लाखांची बोली लागल्याची खमंग चर्चा सुरू आहे. मात्र, अशा स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास 31 दूध संस्थानी या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

ठराव कोणाकडे दाखल करायचा, यावरून उद्‌भवलेले स्थानिक वादही त्याला कारणीभूत आहेत. महाविकास आघाडीकडे द्यायचा की महायुतीच्या नेत्यांकडे द्यायचा यावरून काही संस्थांमध्ये अंतर्गत जोरदार वाद झाल्याचे समोर येत आहे.

यामधील काही संस्था अशा आहेत की, ज्यांना गोकुळमधील सुरू असलेल्या सध्याच्या राजकारणात कोणताच रस नाही. जवळपास 31 संस्था असून यामध्ये सर्वाधिक दूध संस्था शाहूवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील आहेत. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी सहा संस्था आहेत. आजरा आणि भुदरगडमध्ये प्रत्येकी 3, पन्हाळा, शिरोळमध्ये प्रत्येकी चार, चंदगडमध्ये दोन आणि करवीरमधील एका संस्थेचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT