Shambhuraj Desai Janta Darbar
Shambhuraj Desai Janta Darbar Morgiri Reporter
पश्चिम महाराष्ट्र

गृहराज्यमंत्र्यांच्या दरबारात 353 तक्रारी; अधिकाऱ्यांना दिली महिन्यांची मुदत....

अरूण गुरव

मोरगिरी ः गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीतील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या पहिल्याच जनता दरबारात तब्बल 353 लेखी तक्रारी नागरीकांनी दाखल केल्या. यापैकी बहुतांशी तक्रारींचा जागेवरच निपटारा झाल्याने नागरिकांनी दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारींची तातडीने दखल घेत आगामी एका महिन्यात यावरील कार्यवाही पूर्ण करावी. अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंत्री देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिला.

जनता दरबारास मोरणा शिक्षण संस्थेचे रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय बन्सल, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, तहसीलदार रमेश पाटील,‌ जिल्ह्यातील आरोग्य, बांधकाम, शिक्षण, वन, परिवहन तसेच विविध शासकीय विभागातील जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या समवेत पार पडलेल्या जनता दरबारात विविध 353 लेखी तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी काही तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. तर, काही निवेदनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी महिन्याच्या आत कार्यवाही करून समस्या सोडविल्याची माहिती द्यावी, असे आदेश दिले.

पुरवठा विभागसंदर्भात सर्वाधिक निवेदने प्राप्त झाली आहेत. या संदर्भात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बहुतांशी निवेदनांचा निपटारा जागेवरच करण्यात यश मिळाले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

जनता दरबारात मी मंत्री म्हणून जनतेच्या तक्रारी व निवेदनांवर शेरे दिले आहेत. ज्या विभागातील अधिकाऱ्यांच्या संबंधित निवेदन असेल त्या अधिकाऱ्यांनी टॉप प्रायोरिटी म्हणून या बाबींची एक महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT