मंत्री शंभूराज देसाई धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला...

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai हे तत्पर, धाडसी Daring, मदतीला धावून जाणारे running for help मंत्री अशी त्यांची ओळख आहे.
Minister Shambhuraj desai
Minister Shambhuraj desaisarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे काल (शुक्रवारी) मुंबईहून साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे अपघात झाला होता. अपघात झाल्याचे पाहून त्यांनी वाहनांचा ताफा थांबवत तत्परतेने अपघातग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली. नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन पोलिसांना आवश्यक ती मदत करण्याच्या सुचना दिल्या.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे तत्पर, धाडसी, मदतीला धावून जाणारे मंत्री अशी त्यांची ओळख आहे. शुक्रवारी मंत्री देसाई यांचा ताफा मुंबईवरुन साताऱ्याकडे येत होता. त्यादरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे अपघात झाल्याचे मंत्री देसाईंच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ चालकांना गाडयांचा ताफा थांबवुन बाजूला घेण्यास सांगितला.

Minister Shambhuraj desai
शंभूराज देसाईंनी पाटणची निवडणूक टाळली... नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

गाडीतुन उतरुन त्यांनी धावतच अपघातस्थळी जात अपघातग्रस्त कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. अपघातामध्ये कुणाला गंभीर दुखापत वगैरे झाली आहे का, याची खात्री करुन त्यांनी तातडीने स्वत: हायवे पोलिस विभागातील संबंधित अधिकारी यांना फोन करुन अपघातग्रस्त कुटुंबियांना तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या.

Minister Shambhuraj desai
पाटणच्या जनतेसाठी मंत्री शंभूराज देसाई घेणार 'जनता दरबार'

अपघात झालेले वाहन हे संबधित यंत्रणेमार्फत मुंबईकडे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री देसाईंमुळे अपघात झालेल्या कुटुंबियांना तात्काळ आवश्यक ती मदत मिळाल्याने त्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com