Ajinkyarana Patil-Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhima Sugar Factory : भीमा कारखान्यासाठी ७९ टक्के मतदान; कौल पाटील-परिचारकांना की पुन्हा महाडिकांनाच?

भीमा कारखान्यासाठी सर्वाधिक मतदान हे भीमा कारखाना कॉलनी आणि विरवडे बुद्रूक मतदान केंद्रावर झाले. या दोन्ही ठिकाणी १०० टक्के मतदान झाले.

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी चुरशीने ७८.८६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीतील ३५ उमेदवारांचे नशीब मतदानयंत्रात सीलबंद झाले आहे. सोमवारी उद्या (ता. १४ नोव्हेंबर) होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अत्यंत अटीतटीने लढले गेलेल्या निवडणुकीत मतदार माजी आमदार राजन पाटील-प्रशांत परिचारक यांचा पॅनेलला कौल देतात की खासदार धनंजय महाडिक यांच्याकडेच पुन्हा सत्ता सोपवतात, याचे उत्तर उद्या मिळणार आहे. (79 percent voting for Bhima Cooperative Sugar Factory)

भीमा कारखान्यासाठी सर्वाधिक मतदान हे भीमा कारखाना कॉलनी आणि विरवडे बुद्रूक मतदान केंद्रावर झाले. या दोन्ही ठिकाणी १०० टक्के मतदान झाले, त्या खालोखाल ८८.६० टक्के मतदान फुलचिंचोली या केंद्रावर झाले. सर्वांत कमी मतदान उचेठाण केंद्रावर ६३ टक्के मतदारांनी आपला मतनदानाचा हक्क बजावला.

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यावर गेल्या ११ वर्षापासून खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता आहे. मतदानाला सकाळी आठपासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. मतदाराला चारचाकी व दुचाकीवरून आणून मतदान करून घेताना उमेदवार व त्याच्या कार्यकर्त्याची दमछाक झाली. दुपारी दोननंतर मतदान प्रक्रियेस वेग आला. या निवडणुकीत वयोवृद्धांनी ही मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांनी केलेले पाटलांच्या पोरांचे विधान राज्यभर गाजले होते. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्याच भाषेत उत्तर दिले होते. त्या दोघांतील आरोप-प्रत्यारोपांने पंढरपूर, मोहोळचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

मतदान केंद्राला खासदार धनंजय महाडिक, कल्याणराव काळे, दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, सभापती विजयराज डोंगरे, लोकनेते शुगरचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी भेटी दिल्या. गाव पातळीवरील स्थानिक नेते मतदान केंद्र परिसरात ठिय्या मांडून होते. ज्या ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्रे आहेत, त्याला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. या निवडणुकीसाठी गेला पंधरा दिवसापासून दोन्ही गटांनी प्रचाराची राळ उडवून दिली होती. जे मुद्दे व माहिती कधीच बाहेर येणार नव्हती, ती थेट स्टेजवर निघाली.

दरम्यान या निवडणुकीसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी लहान मोठ्या मिळून सुमारे ८० सभा घेतल्या. महाडिक यांचे चुलत बंधू माजी आमदार अमल महाडिक, महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांच्यासह कोल्हापुरातील संपूर्ण महाडिक परिवार प्रचारात सहभागी झाले होते.

या निवडणुकीमुळे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, सभापती विजयराज डोंगरे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विठ्ठल काखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, विठ्ठलचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, माजी उपसभापती मानाजी माने, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर,चंद्रभागा कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT