Padmakar Ghanwat, Vijay Shirke sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Crime News: पद्माकर घनवट, विजय शिर्के यांच्‍यावर गुन्‍हा दाखल; जबरी चोरी, खंडणीचे प्रकरण

Rajendra Chorge २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. गुरुकुल शिक्षण संस्थेचे राजेंद्र चोरगे व इतरांवर सचिन गरगटे यांनी फिर्याद दाखल केली होती.

सरकारनामा ब्युरो

Satara News: गुन्ह्याच्या चौकशीत त्रास देऊन २५ लाखांची मागणी करत आतापर्यंत १२ लाख ३० हजार रुपये, तसेच मोबाईल व इतर वस्तू इच्छा नसताना घेतल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक पद्माकर घनवट व सहायक फौजदार विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात Satara City Police जबरी चोरी, खंडणीसह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

२०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. गुरुकुल शिक्षण संस्थेचे राजेंद्र चोरगे व इतरांवर सचिन गरगटे यांनी फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास झाला असल्याचे पोलिसांनी चोरगे यांना सांगितले होते. दरम्यान, ३ जून २०१७ ला पोलिसांनी चोरगे यांना घनवट यांनी एलसीबीच्या कार्यालयात बोलावले असल्याचे सांगून सोबत नेले.

तेथे घनवट यांनी गरगटेच्या गुन्ह्यात अटक करावी लागेल, असे सांगितले. नंतर सहायक फौजदार शिर्के यांनी अटक न करण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा त्याला चार लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतरही अटकेची व आरोपपत्र दाखल करण्याची भीती दाखवून १२ लाख ३० हजार रुपये, २५ खुर्च्या व मोबाईल घेतल्याचे चोरगे यांचे म्हणणे आहे.

त्याबाबत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र दिले, तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे चोरगे यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यावर झालेल्या सुनावणीत दुसरे मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. साळवे यांनी सातारा शहर पोलिसांना प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार चोरगे यांची फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे. गरगटे याला तीन कोटी रुपये देण्यासाठी संशयितांनी धमकी दिली, तसेच आतापर्यंत चार वेळा प्राथमिक व विभागीय चौकशीत दोघांची कसुरी असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे, असेही चोरगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT