Muslim community gathered at the Satara District Hospital Pramod Ingale, Satara
पश्चिम महाराष्ट्र

Satara Pusesavali News: पुसेसावळी दंगलप्रकरणी पावसकरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल होणार

Satara Police सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जाळपोळीची घटना काल रात्री घडली होती.

Umesh Bambare-Patil

Satara Pusesavali News : पुसेसावळी दंगलप्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला. तसेच जिल्हा रुग्णालय परिसरात ठिय्या मारला. याबाबत पुरवणी तक्रार देण्यासाठी समाजाने पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. भेटीत झालेल्या चर्चेअंती पुरवणी जबाबात भाजपचे पावसकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याने त्या युवकाचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या पुसेसावळी Pusesavali येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जाळपोळीची घटना काल रात्री घडली होती. यामुळे पुसेसावळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेत दोघे युवक गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेमुळे साताऱ्यातील Satara इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुसेसावळी जाळपोळ घटनेतील गंभीर जखमींपैकी एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त मुस्लिम समाजाचे लोक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जोपर्यंत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक होत नाही. तोपर्यंत युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी व नातेवाइकांनी नकार दिला.

तसेच रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, तसेच समाजाने घोषणाबाजी सुरू केली. या वेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त हाेता. दरम्यान, मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबत पुरवणी तक्रार देण्याची मागणी केली.

पोलिस अधीक्षकांसोबतच्या चर्चेअंती पुरवणी जबाबात भाजपचे पावसकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याने त्या युवकाचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. सध्या पुसेसावळी व सातारा शहर परिसरातही तणावाचे वातावरण आहे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT