Satara News: समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी साताऱ्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या पुसेसावळी येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.
यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून साताऱ्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
समाज माध्यमांवर महापुरुषांबाबत बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला होता. या घटनेचे रात्री तीव्र पडसाद उमटले. एका गटाने विशिष्ट समुदायास लक्ष्य करत जाळपोळ, दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गट भिडले.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.