Raju Shetti, Dhairyashil Mane, Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : जयंतराव पाटलांचा वेगळा डाव? प्रतीक पाटलांच्या चर्चेमुळे शेट्टी-मानेना धसका

Rahul Gadkar

Kolhapur News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असणार हे आता सांगणे कठीण बनले आहे. आठवडाभरापूर्वी महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला धावून जाईल, अशी परिस्थिती निर्माण होत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी वेगळाच डाव खेळायला सुरुवात केली आहे.

जयंतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी दोन महिन्यापूर्वी चर्चा होती. मात्र गेल्या दीड महिन्यापासून प्रतीक पाटील यांची कोणतीच हालचाल न दिसल्याने हातकणंगले लोकसभेच्या हालचाली मंदावल्या होत्या. अशातच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सर्वांचीच झोप उडवली. मात्र स्वाभिमानीची भूमिका आणि महायुतीचे आव्हान थोपवण्यासाठी महाविकास आघाडीने वेगळा डाव टाकला आहे.

एकीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला थोपवण्यासाठी महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळ देण्याचे निश्चित ठरल्याचे समोर येत होते. आपल्या विजयापेक्षा महायुतीची एक जागा कमी व्हावी या दृष्टीने महाविकास आघाडीची वाटचाल सुरू आहे. हे गृहीत धरून महाविकास आघाडीने आतापर्यंतच्या चर्चेमध्ये हातकलंगलेच्या उमेदवाराबाबत कोणतीच चर्चा केली नव्हती.

मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महायुती आणि महाविकास आघाडीचेही वावडे आहे. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. शेटटींच्या या धरसोड भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्तेही दुभंगलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी महाविकास आघाडीने पूरक भूमिका घेतली असतानाही शक्ती यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. तर दुसरीकडे महायुतीवर ताशेरे ओढले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे कार्यकर्त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वाढता दबाव आणि शेट्टींच्या भूमिकेबद्दल अजूनही संभ्रमवस्था असल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी वेगळा टाकायला सुरुवात केली आहे. एकीकडे शेट्टी यांच्यावर दबाव वाढावा, शिवाय विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या बद्दल नाराज असलेले महायुतीतील नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रतीक पाटील यांच्या रूपाने वेगळा डाव टाकायला सुरुवात केली आहे.

जर ऐनवेळी प्रतीक पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. तर त्याचा सर्वाधिक फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना बसण्याची शक्यता आहे. शिवाय प्रतीक पाटील यांना माहितीतील आघाडीतील नाराज काही नेते आणि पदाधिकाऱ्यांची रसद मिळू शकते. अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT