Jayant Patil : खळबळजनक! अजित पवार नाही तर जयंत पाटील फडणवीसांची पहिली पसंत...

Ajit Pawar And BJP : जयंत पाटलांचे विश्वासू सहकारी पी. आर. पाटलांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चा
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Jayant Patil
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवार थेट उपमुख्यमंत्री बनले. मात्र भाजपने अजित पवारांना नाही तर सर्वात आधी ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनाच भाजपने उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा पाटलांचे विश्वासू सहकाऱ्याने केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे. आता जयंत पाटील काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. (Jayant Patil News)

राजारामबापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी हा बॉम्ब टाकला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे (Jayant Patil) विश्वासू सहकारी आहेत. दरम्यान, राज्याच्या राजकीय वर्तुळात जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर पी. आर. पाटलांनी स्पष्टीकरण देताना घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Jayant Patil
Raj Thackeray News : राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; लोकसभेसाठी कल्याण, भिवंडीची चाचपणी

पी. आर. पाटील म्हणाले, जयंत पाटलांना भाजपने उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पाटलांशी चर्चा करून भाजपात येण्याची विनंती केली होती. फडणवीसांच्या ऑफरनंतर जयंत पाटलांनी माझ्यासह इतर सहकाऱ्यांशी चर्चाही केली होती, असा दावाही पी. आर. पाटलांनी केला आहे. त्यावर मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला होता. ज्यांनी तुम्हाला आमदार केले, चांगली चांगली खाती दिली. नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी, त्या माणसाला सोडून जायचे नाही, असेही पी. आर. पाटील म्हणाले.

जयंत पाटलांनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपची ऑफर नाकारली. तसेच आपण ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबरच राहण्याचे निश्चित केले. त्यामुळे जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचा चर्चा केवळ अफवा आहेत. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पी. आर. पाटलांनी केले आहे. दरम्यान, जयंत पाटलांची ईडी चौकशी झालेली आहे. त्यानतंरच राष्ट्रवादी काँग्रेस फुटला. तत्पूर्वीच ही भाजपने जयंत पाटलांनाच अजितदादांना दिलेली ऑफर देऊ केल्याचे समोर आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Jayant Patil
CM Shinde Vs Thackeray Group : '...तर वरळीत येऊन पाडू'; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com