Bhanudas Murkute News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : श्रीरामपूरसह राज्यात 'बीआरएस'ची बांधणी करणार; मुरकुटेंचा निर्धार

BRS News : राज्याचा सर्वांगीण विकासासाठी 'तेलंगणा मॉडेल'ची गरज आहे.

सरकारनामा ब्यूरो

महेश माळवे

Ahmednagar News : राज्याचा सर्वांगीण विकासासाठी 'तेलंगणा मॉडेल'ची गरज आहे. भविष्यात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात व राज्यात पक्ष बांधणीसाठी काम करणार आहे. राज्यात 'अबकी बार किसान सरकार' आणण्याचा निर्धार असल्याचे, महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कार्यकारी समिती सदस्य माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सांगितले. कालेश्वरम या जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेसह अन्य विकास कामे व विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणीनंतर आपण बीएसआर पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतल्याचीही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भानुदास मुरकुटे बोलत होते. मुरकुटे म्हणाले, महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता असून राज्यकर्ते राजकीय उखाळ्यापाखाळ्यात अडकले आहेत. अशावेळी राज्याला भारत राष्ट्र समितीसह के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्यासारख्या दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. राज्यात जनतेने पक्षाकडे सत्ता दिली, तर तेलंगणाच्या (Telangana) धर्तीवर योजना राबवून सर्वांगीण विकास होईल.

शेती समृध्द होवून शेतकर्यांचे आर्थिक परिवर्तन होईल. समाजातील सर्व घटकांचे जीवनमान बदलेल. हा बदल हवा असेल आणि राज्यात परिवर्तन घडवायचे असेल तर राजकीय परिवर्तन करावे करणे गरजेचे आहे. बीआरएस (BRS) राज्यातील ४८ लोकसभा व २८८ विधानसभा जागा लढविणार आहे.

किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम म्हणाले, राज्यातील शेती व शेतकर्‍यांची स्थिती बदलायची असेल तर तेलंगणा राज्याच्या धोरणांचा अवलंब करावा लागेल. राज्यात राजकीय बदल घडवावा लागेल. तशी मानसिक तयारी जनतेने ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शेलार, माजी आमदार अण्णासाहेब माने, कदीर मौलाना, मंजुश्री मुरकुटे, सुनिता गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गणेश छल्लारे यांनी केले.

माणिक कदम यांनी सुरेश गलांडे (तालुकाध्यक्ष), मयूर पटारे (उत्तर नगर जिल्हा समन्वयक), शरद पवार (दक्षिण नगर जिल्हा समन्वयक) याप्रमाणे जिल्ह्यातील पदाधिकार्यांची नियुक्ती केली. यावेळी घनःशाम शेलार, रमेश रेठे, मतिन शेख, अशोक धातोडकर, सुनिता सोनटक्के, कोंडीराम उंडे, ज्ञानदेव साळुंके, सुरेश गलांडे, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब काळे, अ‍ॅड. सुभाष चौधरी, काशिनाथ गोराणे, बाबासाहेब ढोकचौळे, पुंजाहरी शिंदे, भागवत पवार, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, सुनीता गायकवाड, मीरा बडाख, शीतल गवारे आदी उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT