Ujjwal Nikam News : राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार गटाचाच व्हिप मानावा लागेल, अॅड. उज्वल निकमांनी केले स्पष्ट

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
Ujjwal Nikam News
Ujjwal Nikam NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेस नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या फुटीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. मात्र, पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांची भेट घेतलीची चर्चा आहे. ही भेट घेतली नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले असले तरी त्या चर्चा थांबतांना दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या या सत्तासंघर्षाबाबत बोलताना जेष्ठ विधीतज्ञ अॅड. उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी जयंत पाटील यांनाच आपल्याकडे वळवण्याची व्युव्हरचना असू शकते असे मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात विधीमंडळात फूट पडली. त्यामुळे त्यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. विधीमंडळात अधिकृत प्रतोद नियुक्त करण्याचा अधिकार राजकीय पक्षाच्या प्रमुखाला असतो. घटनेच्या दहाव्या परिशिष्टामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यांनी विधीमंडळात गटनेते म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे.

Ujjwal Nikam News
Shasan Aplya Dari Jejuri News : फडणवीस म्हणतात, अजितदादांमुळे आमची गाडी सुसाट !

त्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आदेश महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपल्याकडे वळविणे ही व्युव्हरचना असू शकते, असे निकम म्हणाले. एखाद्या राजकीय पक्षाचा प्रमुख हा त्या पक्षाचा अधिकृत प्रतोद नेमत असतो. नुकतीच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली, असल्याचे निकम यांनी सांगितले.

त्यामुळे राष्ट्रवादी हा अधिकृत पक्ष ज्याची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेले आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळाचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार हा पक्षाने निवडलेल्या प्रतोदाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतोद म्हणून जयंत पाटील यांनी नियुक्ती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार गटाचा व्हिप मानावा लागेल, असे निकम यांनी स्पष्ट केले.

Ujjwal Nikam News
Eknath Shinde Shivsena News : कोकणातला 'हा' बडा नेता शिंदेंची साथ सोडणार अन् भाजपात जाणार...! ; ठाकरे गटाच्या नेत्याने वात पेटवली

शरद पवार गटात कुणी फितुर होईल असे आज या मितीस आपणास म्हणता येणार नाही. त्यामुळे विधीमंडळात जो राजकीय पक्ष आदेश काढत असेल आणि त्या आदेशाचा भंग झाला असेल तर त्यावर पक्षाच्या प्रतोदाला कारवाई करता येते, अजितदादा पवार व जयंत पाटील यांची मैत्री पूर्वीच्या राजकीय पक्षात जरी असली तरी जयंत पाटील यांनी जो आदेश दिला आणि त्यांचा भंग केला, असेल तर त्यावर कारवाई होवू शकते. मात्र, आज त्यावर भाकित करणे कठीण आहे, असेही निकम यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com