Kolhapur Vidhan Sabha  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena News : येत्या काही दिवसांत कोल्हापुरात राजकीय भूकंप, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

Rahul Gadkar

Kolhapur News, 24 August : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकसंघपणे काम करत आहे. राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. लोकसभेत राजघराण्याविषयी कोल्हापूर वासियांचे असलेले प्रेम हेच पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे.

परंतु, पराभवाने खचून न जाता शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात एकसंघपणे काम करतेय. त्यामुळे शिवसेनेमध्ये सामील होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. येत्या काही दिवसांत कोल्हापुरात राजकीय भूकंप होणार असून, जिल्ह्यातील मोठे नेते आगामी काळात शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतील.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आणणार, असा विश्वासही राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये केली जात आहेत.

ही वक्तव्ये निषेधार्थ असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची लोकप्रियता व लाडकी बहीण योजनेचे यश सावत्र भावांच्या डोळ्यात खुपत असल्याचे टीका राजेश क्षीरसागर यांनी केली. काल काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला राजेश क्षीरसागर यांनी सडेतोड उत्तर दिलं.

महायुती सरकारप्रती नागरिकांची आत्मीयता वाढत असल्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठला असून त्यांच्याकडे टीका करणं आणि जनतेत गैरसमज पसरविणे याशिवाय दुसरे कामच शिल्लक नाही. लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) बंद पडावी यासाठी विरोधक न्यायालयात गेले. योजनेबाबतीत गैरसमज पसरविण्याचं काम केलं, अशा घरभेदी सावत्र भावांना जोडे मारले पाहिजेत, यातमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे काहीही चुकलेलं नाही. अशा शब्दात पाठराखण क्षीरसागर यांनी केली.

कोल्हापूर (Kolhapur) अशांत करण्याचा प्रयत्न नेहमीच माजी पालकमंत्र्याकडून केला जात आहे. कोल्हापुरात दंगल घडण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी ते करतात. त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होते. याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. विशाळगड प्रकरणी धावत जाणारे पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या हिंदू विरोधी वक्तव्याचा साधा निषेध करू शकत नाहीत.

यातून त्यांचा राजकीय स्वार्थ दिसून येतो. त्यामुळे आगामी काळात जतना कोणत्याही अफवांना, भूलथापांना बळी न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या पाठीशी ठाम उभी राहील आणि विरोधकांना त्यांच्या जागा दाखवेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT