अहमदनगर - शाळेतील विद्यार्थ्यांनी दंगा केला की शिक्षक त्यांना शिक्षा देतात मात्र अहमदनगरमध्ये माध्यमिक शिक्षकांनीच आपसात दंगा केला. अहमदनगर जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या बँकांची सर्वसाधारण सभा नेहमी वादळी ठरते, यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरले नाही. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत यंदाही गोंधळ झाला. ( A riot of secondary teachers at a bank meeting )
काही सभासद शिक्षक नशेत असल्यामुळे ते काय बोलत होते, हे कोणालाच कळत नव्हते. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. बोलण्यासाठी अगदी माईकची ओढाओढ झाली. त्यात तो तुटला. या मद्यपींमुळे इतर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी तर ही कीड लागली आहे, ती कधी जाणार नाही... अशी नाराजी व्यक्त केली.
माध्यमिक शिक्षक सोसायटीची 76 वी सर्वसाधारण सभा दोन वर्षानंतर ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश मिसाळ होते. उपाध्यक्ष अण्णासाहेब ढगे, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, महेंद्र हिंगे, चांगदेव खेमनर, ज्ञानेश्वर काळे, काकासाहेब घुले, बाबासाहेब बोडखे, अप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष मिसाळ यांच्या मनोगतानंतर सभेला सुरवात झाली. यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचनास स्वप्निल इथापे वाचू लागले. मागील सभेतील मुद्द्यांची नोंद इतिवृत्तात का घेतली नाही, असा मुद्दा अप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला. त्यानंतर वादंग सुरू झाले. गोलगोल उत्तरे देऊन सभासदांची बोळवण करू नका, असे विरोधी संचालक व सभासदांमधून बोलले जात होते. कचरे यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
डाटा सेंटरला विरोध अनं विषयांना मंजुरी
सोसायटीमधील डाटा सेंटरमधील सर्व्हर भाडेतत्वावर घेण्यास विरोधी गटाचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी विरोध केला. यावर बराच वेळ चर्चा झाली. डाटा सेंटरला विरोध दर्शविण्यात आला. मात्र सर्व विषयांमध्ये हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ संचालक कचरे यांनी मी सेवा निवृत्त होत आहे. त्यामुळे सभासदांच्या प्रश्नाला उत्तरे देता यावी, म्हणून आज सभा घेतल्याचे सांगितले. सचिन फटांगरे यांनी सभा मे महिन्यात घ्यावी, असा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.